Translate :

Sponsored

अमेरिकेने शत्रूला बनवले मित्र ; अल-कायदा आता दहशतवादी संघटना म्हणून ओळखली जाणार नाही ; अमेरिकेचा झाला निर्णय : Trump Removed Syria HTS Terrorist Organization Sanctions.

Syria HTS : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरीयातील हयात तहरीर अल-शाम (HTS) या संघनेवर लावण्यात आलेले सर्व निर्बंंध उठवले आहे. सध्या इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे अमेरिका दौऱ्यावर असताना, अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे, हे विशेष मानले जात आहे. 

वॉशिंग्टन : 08/07/2025

डोनाल्ड ट्रम्प यांनी मे महिन्यात मध्य पूर्वेचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी  दिलेल्या आश्वासनाची पूर्तात आता अमेरिकन प्रशासनाने केली आहे. अमेरिकेतील एका उच्च प्रशासकिय अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले आहे की, ट्र्म्प सरकारने सीरिया स्थित ‘हयात तहरीर  अल-शाम’ संघटेनेला परदेशी दहशतवादी संघटनेच्या (FTO) च्या यादीतून हटवण्यात आले आहे. 

हा निर्णय अशावेळी घेण्यात आला आहे की, जेव्हा इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. नेतन्याहू अनेक वर्षांपासून HTS ला इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोकादायक समजतात. अल नुसरा फ्रंट आधी सीरियामध्ये अल-कायदाची एक शाखा म्हणून स्थित होता. मात्र नंतर या संघटनेने ‘हयात तहरीर अल-शाम असे स्वतःच्या संघनेते नामांतर करून, स्वतंत्र बनली. 

ट्रम्प यांनी दिले होते आश्वासन

अमेरिकन प्रशासनातील अधिकारी मार्को रूबिया यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 13 मे ला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सीरियावर लावण्याक आलेल्या निर्बंधांच्या बाबत शिथिलता आणून, हयात तहरीर अल-शाम (HTS) या संघटनेवरील निर्बंध हटवून, तिचे परदेशी दहशतवादी संघटनेच्या यादीतून नाव वगळण्यात आले आहे. हा आदेश 8 जुलै पासून अंमलात आणण्यात येईल. 

त्यांनी सांगितले की, हा निर्णय घेण्यात आला आहे, कारण सीरिया प्रशासनाने HTS या संघटनेवर बंदी घालण्याची  घोषणा केली आहे. तसेच दहशतवादाविरोधात वेळोवेळी सीरिया योग्य ती कारवाई करणार असल्याचे सीरिया कडून स्पष्ट करण्यात आले आहे, म्हणून अमेरिकेने आपला शब्द पाळला आहे. रुबिया यांच्या मते हा निर्णय सीरियाचे राष्ट्रपती अहमद अल-शरा द्वारे करण्यात आलेल्या सकारात्मक प्रयत्नांमुळे घेण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, FTO यादीतून HTS संघटनेला काढून टाकून ट्रम्प यांनी शांतीपूर्ण, एकात्मता आणि स्थिर सीरियाच्या ध्येयाला एक दिशा दिली आहे. त्याबाबतचा हा पहिला प्रयत्न आहे. 

 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored