Tiktok US Ownership : अमेरिकेचे राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप यांनी टिकटॉक या ॲपसाठी निर्देश दिले आहेत. या निर्देशामुळे आता अमेरिकेत टिकटॉक संबंधी मोठा करार होण्याच्या दृष्टीने हिरवा कंदील मिळाला आहे.
व़ॉश्गिंटन : 26/09/2025
वॉश्गिंटन डीसी मध्ये शुक्रवारी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एका आदेशावर स्वाक्षरी करून टिकटॉक (Tiktok US Ownership) या ॲपला अमेरिकेत चालवण्यासाठीची परवानगी दिली आहे. व्हाईट हाऊस मध्ये स्वाक्षरी करून ट्रंप यांनी सांगितले आहे की, त्यांची चीनच्या राष्ट्राध्याक्ष सी जिनपिंग यांच्याशी सकारात्मक बोलणी झाली आहे. ज्याअंतर्गत टिकटॉक चा करार झाला आहे. त्यांनीही या कराराविषयी सहमति दाखवली आहे.
या नव्या आदेशा नुसार अमेरिकेत आता टिकटॉक वापरता येणार आहे.आता हे ॲप अमेरिेकेत एका नव्या व्यवसायाच्या स्वरूपात उभा राहणार आहे. हा व्यवसाय म्हणून अमेरिकेत स्थापन होणार आहे. या कंपनीचे जास्तीत जास्त अधिकार हे अमेरिकन नागरिकांकडे असणार आहेत. ज्यामुळे त्याचे नियंत्रण कोणत्याही विदेशी लोकांकडे असणार नाही.
सुरक्षा आणि नियंत्रण यावर असणार लक्ष (Tiktok US Ownership)
ट्रंप यांनी सांगितले आहे की, टिकटॉक आता अमेरिकन कंपनीकडे आणि नागरिकांकडे असणार आहे. ज्यामुळे डेटा सुरक्षा आणि गोपनीयता यांच्याशी निगडीत समस्या रहाणार नाहीत. त्यांच्या मते आता हे ॲप अमेरिकन कंपन्या आणि वापरकर्त्यांकडून चालवण्यात येणार आहेत. अमेरिकेतील तरूण पिढीची अशी इच्छा होती की, हा करार पूर्ण व्हावा आणि आम्ही तो केला आहे. ओरेकलचे सहसंस्थापक लैरी एलिसन आणि त्यांची कंपनी या ॲपच्या सुरक्षेसंबंधीची व्यवस्था सांभाळणार आहे. त्यांनी सांगितले आहे की, ओरकल आणि कंपनी या ॲपला अधिक सुरक्षित बनवण्याकडे लक्ष पुरवणार आहे.
अमेरिकी युजर्सचा डेटा असणार सुरक्षित (Tiktok US Ownership)
नवीन अमेरिकन कंपनीची किंमत सुमारे 14 अरब डॉलर इतरी आहे. उपराष्ट्रपती जे.डी. वेंस यांच्या मतानुसार हा आकडा बराच कमी आहे. मात्र हे ॲप अमेरिकेत सक्रिय असणार आहे. अमेरिकी नागरिकांचा डेटा यामुळे सुरक्षित रहाणार आहे. चीनने यासाठी थोडा विरोध केला मात्र आमचा उद्देश्य स्पष्ट होता. हे ॲप देशात सुरू तर रहावे मात्र नागरिकांची प्रयव्हसी सुद्धा सुरक्षित रहावी. यासाठी ट्र्ंप यांच्या आदेशानुसार या टिकटॉक ॲपचे अल्गोरिदम अमेरिकी कंपन्यांकडून नियंत्रित केले जाणार आहेत.
ट्रंप यांनी सांगितले की, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी फोनवर बोलणे झाल्यानंतर या कराराला हिरवा कंदिल देण्यात आला आहे. तज्ञांच्या मते या कराराविषयी आणखी माहिती जाहिर करावी. कारण अल्गोरिदम संबंघित अनेक मुद्दे अजून अनुत्तरित आहेत. चीनचे संपू्र्ण नियंत्रण हटवण्यात आले आहे की नाही हे अजून समजले नाही.