TET Exam Update : येत्या 5 नोव्हेंबरला रोजी सकाळी 11 वाजता दसरा चौक या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
मुंबई : 01/12/2025
टीईटी परीक्षा रद्द करावी, (TET Exam Update) संच मान्यतेचा आदेश रद्द करावा, शिक्षण सेवक पद रद्द करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, या प्रमुख मागण्यांसाठी येत्या 5 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, सर्व मनपा, खाजगी उच्च माध्यमिक, प्राथमिक शिक्षक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक मुख्याधिपाक संघ कोल्हापूर येथे संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड होते. टीईटी परीक्षेत संदर्भात राज्य शासनाने पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालय दाखल कऱणार असल्याचे सांगितले होते.
पण प्रत्यक्ष अजून याचिका दाखल झालेली नाही. 15 मार्च 2024 या संचमान्यतेच्या आदेशामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यातबरोबर शिक्षण सेवकपद रद्द करून शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागण्यांवर संघटना बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
येत्या 5 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता दसरा चौक या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून, जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी शाळा बंद ठेवून संख्येने आंदोलनात उतरावे, असे आवाहन सर्व शिक्षक संघटनांच्या (TET Exam Update )वतीने करण्यात आले आहे.
यावेळी पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, सभाध्यक्ष एस.डी.लाड, शिक्षक नेते दादा लाड, सुधाकर सावंत, उमेश देसाई, सुधाकर निर्मळे, प्रसाद पाटील, विलास पिंगळे, बाबा पाटील सचिव आर.वाय. पाटील, भरत रसाळे, जुनी पेन्शन संघटनेचे मंगेश धनवडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
4 लाख 46 हजार 730 परीक्षार्थींनी दिली परीक्षा (TET Exam Update)
राज्यभरात 23 नोव्हेंबर रोजी TET ( Teacher Eligibilty ) परीक्षेचे आयोजन कऱण्यात आले होते. ही परीक्षा राज्यातील 37 जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आली होती. 37 जिल्ह्यातील एकुण 1,423 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा आयोजित केली गेली. त्या 4,75,669 पैकी 4,46,730 परीक्षार्थीं उपस्थित होते. एकंदरीत, या परीक्षेत 93.91 % उमेदवारांनी उपस्थिती दर्शवली होती.