Translate :

Sponsored

Tanisha Bhise Death Case : तनिषा भिसे मृत्यू : अखेर डॉ.सुश्रुत घैसास (Dr. Sushrut Ghaisas ) यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

दिनानाथ मंगेशकर (Dinanath Mangeshakr Hospital) रूग्णालय गर्भवती मृत्यूप्रकरण

पुणे : 19 एप्रिल 2025

दिनानाथ मंगेशकर (Dinanath Mangeshakar Hospital ) रूग्णालयातील स्री रोगतज्ञ डॉ. सुश्रुत घैसास (Dr. Sushrut Ghaisas )  यांच्यावर पुण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससून रूग्णालयाचा अहवाल आल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र त्यांनी तनिषा भिसे (Tanisha Bhise ) प्रकरणात हलगर्जीपणा केला असल्याचे या अहवालात म्हटले असल्याने अखेर त्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

आत्तापर्यंतची या प्रकरणातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. दिनानाथ मंगेशकर रूग्णालयातील तनिषा भिसे या गर्भवति महिलेचा मृत्यू झाला होता, त्या प्रकरणाची ससून समितीचा दूसरा अहवाल समोर आला आहे. या दुसऱ्या अहवालात डॉ. घैसास (Dr. Sushrut Ghaisas )  हे दोषी असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार डॉ. घैसास यांच्यावर शहरातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

१८ एप्रिल ला पहिला अहवाल ससून कडून पुणे पोलीसांना सादर केला होता. मात्र त्यात डॉ.घैसास यांना क्लिन चिट देण्यात आली होती. त्यामुळे सर्वत्र नाराजीचा सूर आणि आच्छर्य व्यक्त केले जात होते. दुसऱ्या अहवालात उपचारात हलगर्जीपणा केल्याचा ठपका डॉ. घैसास यांच्यावर ठेवून त्यांच्यावर कलम 106 (1) नुसार अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 भाजप आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सचिवांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा प्रसुती दरम्यान एका रूग्णालयात मृत्यू झाला. त्याआधी दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांच्याकडे उपचारासाठी डिपॉझिट म्हणून 10 लाख रूपये मागण्यात आले होते. त्या दरम्यान उपचाराला दिरंगाई होऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि डॉ. घैसास हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. जनसामान्यांनामध्ये या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळलेली आहे. अशात आज या केसबाबत पहिला गुन्हा दाखल झाला आहे.

 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored