Translate :

Sponsored

T20 World Cup India Update, 2026 : भारताच्या चिंतेत वाढ, स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा रूग्णालयात, भारताचा ‘प्लॅन बी’ काय असणार ? : T20 World Cup 2026 Shock to India Explosive batsman Abhishek Sharma Admitted To Hospital

भारताच्या चिंतेत वाढ, स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा रूग्णालयात ( फोटो- सोशलमीडीया)

T20 World Cup India Update : टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धा सध्या एका वेगळ्या उंचीवर आहेत. मात्र दुसऱ्या सामन्याआधी भारतीय संघाला धक्का बसला आहे. भारताच्या सलामवीर अभिषेक शर्मा रूग्णालयात भरती झाला आहे.

टी-20 विश्वचषक – 11-02-2026 

टी-20 विश्वचषक 2026 (T20 World Cup India Update) स्पर्धा चांगल्याच रंगात आली आहे.  मात्र, या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्याआधी भारतीय संघाची चिंता वाढली आहे. भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा अचानक आजारी पडला आहे. त्यामुळे त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका वृत्तानुसार, त्याला पोटाच्या संसर्गाचा त्रास जाणवू लागल्याने तो मंगळवारी संघाच्या सराव सत्रात देखील सहभागी होऊ शकला नाही.

मागील सामन्यापासून अभिषेक शर्माची प्रकृती खराब असल्याची माहिती आहे. अमेरिकेविरूद्धच्या सामन्यापूर्वी तो अस्वस्थ असल्याचे दिसून येत होते. परंतु सामना खेळल्यानंतर त्याची प्रकृती आणखी बिघडली. त्याला खुप ताप आला होता आणि तात्काळ आराम मिळावा म्हणून त्याला ड्रिप देखील देण्यात आला होता. या आजाराने त्याच्या कामगिरीवर देखील परिणाम झाल्याचे दिसले. कारण त्याला खाते न उघडताच माघारी जावे लागले होते. त्यानंतर मैदानात तो दिसला नाही. संपूर्ण सामन्यात त्याच्या जागी संजू सॅमसनने क्षेत्ररक्षण केले आणि सामना संपल्यानंतर अभिषेक खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यासाठी देखील बाहेर येऊ शकला नाही.

नामिबियाविरूद्ध संघात स्थान असणार का ?  (T20 World Cup India Update)

बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, अभिषेक शर्माला दिल्लीतील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्याच्या प्रकृतीचे मूल्यांकन कऱण्यासाठी चाचण्या करण्यात येत आहेत. सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेट यांनी आशा व्यक्त केली की तो पुढील दोन दिवसांत बरा होणार आहे, परंतु त्याची सध्याची प्रकृती पाहता 12 फेब्रुवारी रोजी नामिबियाविरूद्धच्या सामन्यात त्याचा सहभाग संशयास्पद असल्याचे दिस आहे. संघ व्यवस्थापन त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

वॉशिंग्टन सुंदर संघात सामील  (T20 World Cup India Update)

अभिषेक शर्माला रूग्णालयात भरती केले असले तरी, सहाय्यक प्रशिक्षकांनी पुष्टी केली आहे की, अष्टपैलु वॉशिंग्टन सुंदर संघात सामील झाला आहे, आणि दुसऱ्या गट सामन्यापूर्वी त्याने सराव देखील सुरू केला आहे. याव्यतिरिक्त, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर संघात परतला आहे आणि तो पुर्ण जोमाने गोलंदाजी करत आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored