Translate :

Sponsored

Swarajya Mahotsav 2026, Great News : शिवजन्मोत्सवाचा होणार जल्लोष ! पर्यटन विभागाच्यावतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव 2026’ : Maharashtra Tourism Announced Hindavi Swarajya Mahotsav 2026 At Shivneri Occasion Of Shivjayanti

शिवजन्मोत्सवाचा होणार जल्लोष ! पर्यटन विभागाच्यावतीने शिवनेरीवर रंगणार 'हिंदवी स्वराज्य महोत्सव 2026

Swarajya Mahotsav 2026 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र पर्यटन विभागाने ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव 2026’ ची घोषणा केली आहे. हा तीन दिवसीय महोत्सव दि. 17 ते 19 फेब्रुवारीदरम्यान शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या मैदानावर रंगणार आहे.

पुणे : 16-02-2026 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव: हिंदवी स्वराज्य महोत्सव 2026’ चे  (Swarajya Mahotsav 2026) आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 17 ते 19 फेब्रुवारीदरम्यान शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या मैदानावर हा तीन दिवसीय महोत्सव रंगणार आहे. पुणे जिल्हा प्रशासन आणि राज्याच्या पर्यटन विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

महोत्सवाचे औपचारिक उद्धाटन 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार असून, शिवकालीन इतिहास, संस्कृती आणि लोकपरंपरांना उजाळा देणारे विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.

पर्यंटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण राष्ट्राचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या जन्मस्थानी हा महोत्सव साजरा करणे ही अभिमानाची बाब आहे. या उपक्रमातून शिवकालीन विचार आणि संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्न होणार असून, पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी सांगितले की, महोत्सवाचे स्वरूप सर्वसमावेशक असून पारंपरिक कला, लोककला आणि स्थानिक उपक्रमांना व्यासपीठ दिले जाणार आहे. पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी.एन. पाटील यांनी सांगितले की, स्थानिक कला , खेळ आणि संस्कृतीचे संवर्धन हा महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. शिवभक्त आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहनही त्यांनी केले आहे.

तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन  (Swarajya Mahotsav 2026)

17 फेब्रुवारी रोजी उद्धाटन सोहळ्यानंतर लोकगीतांवर आधारित ‘द फोक आख्यान’, कबड्डी स्पर्धा, बैलगाडा शर्यत, महिला बचत गटांचे प्रदर्शन आणि खाद्य महोत्सव हे आकर्षण ठरणार आहे.

18 फेब्रुवारी रोजी बैलगाडा शर्यत, लोककला सादरीकरण, केसरी कुस्ती स्पर्धा, शिवाजी महाराजांना मानवंदना आणि ‘ऑल दि बेस्ट’ या नाटकाचे सादरीकरण होणार आहे.

19 फेब्रुवारी ला शिवकालीन मर्दानी खेळांचे सादरीकरण, महिला बचत गटांचे प्रदर्शन आणि सायंकाळी भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. महाआरती आणि बहुरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सवाची सांगता होणार आहे.

राज्याच्या पर्टयन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकारातून आयोजित या ऐतिहासिक सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored