Vishanavi Hagwane Case Update : तब्बल दोन आठवडे उलटूनसुद्धा महाराष्ट्रातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. वैष्णवीचा हुंड्यासाठी छळ सुरू होता, त्या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्या केली असे सांगण्यात आले. पोलिसांनीही तशीच नोंद केली आहे. मात्र आता पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यापासून अनेक मतमतांतरे सुरू आहेत. अशातच उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare ) यांनी सुचक विधान करत आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे.
पुणे : 2025-05-28
पुण्यातील वैष्णवी हगवणे (Vishanavi Hagwane ) प्रकरण अजूनही शांत होण्याची कोणती चिन्हे दिसत नाहीत. वैष्णवी हगवणे हिने 16 मे ला गळफास घेऊन आत्महत्य केली असल्याचे पोलीस स्टेशन ला नोंद करत तिच्या सासरच्यांविरोधात गुन्हा नोंदवला गेला. राज्यभरातून या विषयी संतापाची लाट उसळली. तिचा छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केले म्हणून तिचा नवरा, दिर, सासरा, सासू आणि नणंद यांना अटकही झाली. मात्र आता या प्रकरणाचे विविध कंगोरे बाहेर येत आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रीया देत गंभीर आरोप केले आहेत.
वैष्णवी हगवणे प्रकरणी सुषमा अंधारे यांची प्रतिक्रीया (Sushama Andhare )
वैष्णवी हगवणे हिच्या शरीरावर तब्बल 19 मारल्याच्या खुणा, जखमा आहेत. सर्व जखमा या तिच्या मृत्यूच्या दिवशी झालेल्या आहेत. तिचा मृत्यूच संशयास्पद आहे. पोलिसांनी तिच्या मृत्यूची नोंद संशयास्पद मृत्यू अशी करणं अपेक्षित असताना, आत्महत्या अशी केली गेली. त्यामुळे पोलीसांच्या एकुण कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे रहाते. निलेश चव्हाण वरती यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत, पुणे ग्रामीण पोलीसांनी निलेश चव्हाण याला शस्र परवाना नाकारला होता, मात्र जालंदर सुपेकर यांच्या शिफारशीने त्याला शस्र परवाना मिळाला. बड्या लोकांचा, राजकीय लोकांचा आणि पोलिसांचा वरदहस्त या प्रकरणातील लोकांवर आहे. मयुरी हगवणेची तक्रार न घेता करिष्मा हगवणेची तक्रार महिला आयोगांन घ्यावी, हे सर्व अतिशय गुंतागुंतीचं आणि संशयास्पद आहे.
सध्या वैष्णवी हगवणे प्रकरण महाराराष्ट्रात गाजत आहे. तिची हत्या की आत्महत्या हा गुंता सुटेलच. सर्व माध्यमं, राजकीय नेते आणि समान्य जनता यांनी जेव्हा हे प्रकरण उचलून धरले तेव्हापासून या प्रकरणाच्या तपासाची चक्रे वेगाने फिरली. सध्या या प्रकरणी वैष्णवी हगवणे हिचा पति, सासू, नणंद, दिर, सासू आणि सासरा असे सर्वांना आता अटक झाली आहे. दरम्यानच्या काळात दिर आणि सासरा फरार असताना ज्यांनी त्या दोघांना मदत केली त्या लोकांनाही अटक केली जात आहे. पोस्टमार्टमचा रिपोर्ट आणि अटकसत्रातून रोज नविन खुलासे होत आहेत. अशावेळी सुषमा अंधारेंसारख्या (Sushama Andhare ) नेत्यांची प्रतिक्रीया , त्यांनी व्यक्त केलेला संशय महत्त्वाचा ठरतो.