Translate :

Sponsored

Students DropOut Maharashtra Education Issue : तब्बल 3 लाख विद्यार्थ्यांनी सोडलीये शाळा ! महाराष्ट्रातील बिकट शैक्षणिक स्थीती !

Students DropOut, Maharashtra  Education Issue : पुरोगामी महाराष्ट्राला शिक्षणाची मोठी परंपरा आहे. अशा या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे ? कसे आणि का ? हे जाणून घेऊ.

 महाराष्ट्र : 21/07/2025

महाराष्ट्रात राज्यातील एकुण 8,000 गावांमध्ये अजूनही शाळा नाहीत. अशी परिस्थिती असताना आता आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट दिसून आली आहे. राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये एकुण 3,36416 विद्यार्थ्यांची गळती (Students DropOut)झाली आहे. 

हे सर्व आकडे शिक्षणक्षेत्रासाठी गंभीर बाब आहे. सध्या शिक्षणविभाग या विद्यार्थी गळतीमुळे चिंतेत आहे. विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या पुस्तकांच्या संख्येवरून ही बाब समोर आली आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत यावर्षीसुद्धा विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप करण्यात आले. मात्र विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा जास्त पुस्तकं पोहोचल्यामुळे, विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याचे  समजले. 

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे तक्रार  (Students DropOut )

या मुद्द्यावरून काही संघटनांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन शिक्षण परिषदेने एकुण विद्यार्थ्यांच्या संख्येची माहिती घेतली. त्यातून धक्कादायक आकडे  समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येत इतकी घट का झाली ? यांची माहिती आणि कारणं जाणून घेण्यासाठी परिषदेचे प्रकल्प अधिकारी संजय यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे निर्देश दिले आहे. परिषदेकडून विद्यार्थ्यांची संख्या कमी का झाली याचे कारण शोधून काढण्याचे कठोर आदेश दिले आहेत. 

विद्यार्थ्यांची घट कशी समजली ? (Students DropOut)

  • यावर्षी  एकुण  पुस्तकं 1 करोड 94 हजार 360 इतकी विद्यार्थीसंख्या गृहीत धरून तयार ठेवले होते.
  • 97 लाख 57 हजार 944 इतकी विद्यार्थ्यी संख्या महाराष्ट्रात सध्या आहे. 2023-24 च्या डेटा नुसार ही आकडेवारी आहे.
  • 3 लाख 36 हजार 416 इतके विद्यार्थी शाळेतून गळाले आहेत.

विदर्भातील वर्षभरातील विद्यार्थी परिस्थिती (Students DropOut)

जिल्हा                     घटलेल्या विद्यार्थ्यांची संख्या
नागपूर 9,415
गडचिरोली 1,863
गोंदीया 3,877
अकोला 6,343
अमरावती 7,269
भंडारा 3,403
बुलढाणा 12,756
चंद्रपूर 7,077
वर्धा 4,425
वाशीम 6,545
यवतमाळ 12,198

8.73 लाख विद्यार्थ्यांना 11 वी प्रवेशाची प्रतिक्षा  (Maharashtra  Education Issue )

महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाकडून राज्यभरात इयत्ता 11 वी साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पार पडली. तिसऱ्या फेरीनंतरही अजून 8.73 लाख विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात अत्तापर्यंत फक्त 50 % विद्यार्थ्यांचे अकरावी इयत्तेत प्रवेश मिळाले आहेत. तांत्रिक अडचणी, फेरी प्रक्रियेला उशीर अशा अनेक कारणांमुळे प्रवेशप्रक्रियेला उशीर होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यी आणि पालकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. 

 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored