Translate :

Sponsored

State Civil Aviation Minister Murlidhar Mohol Said Ahemdabad Plane Crash Truth To Be Revealed In 3 Months : अहमदाबाद विमान अपघाताचे सत्य बाहेर येणार ; तीन महिन्यात येणार चौकशीचा अहवाल .

Ahemedabad Palne Crash; Murlidhar Mohol : केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे की, अहमदाबाद विमान अपघाताची चौकशी तीन महिन्यात पूर्ण होणार आहे. ब्लॅक बॉक्समुळे कारणांचा उलगडा होणार आहे. या अपघातात एकुण 270 जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण जगात या विमान अपघाताविषयी हळहळ व्यक्त होत आहे. 

पुणे : 2025-06-17

केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी मंगळवारी सांगितले की, अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमानाला अपघात घडला, त्या अपघाताच्या चौकशीसाठी एक केंद्र सरकरची उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या उच्च स्तरीय समितीचे काम तीन महिन्यात पूर्ण होणार आहे. तीन महिन्यानंतर ही समिती आपला अहवाल सरकारकडे सोपवणार आहे. 

नागरी उड्डाण राज्य मंत्री मोहोळ म्हणाले की, एअर इंडिया 34 बोईंग-787 ड्रिमलाइनर विमान उड्डाणाचे परिक्षण करते. ज्यातील 12 विमानांची सुरक्षा तपासणी झाली आङे आणि त्यात अत्तापर्यंत कोणतीही नादुरूस्ती आढळून आलेली नाही. विमानातील ब्लॅक बॉक्समुळे विमान अपघाताच्या कारणांचा सुगावा लागेल, अशी अपेक्षाही मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केली. 

241 प्रवाशांचा मृत्यू

बोईंग 787 ड्रिमलायनर विमान (एआयई 171 ) 12 जून ला अहमदाबाद च्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघाले होते. विमानाने उड्डाण केल्यापासून काही सेकंदातच ते एका मेडिकल कॉलेजच्या परिसरात कोसळले. या अपघातात एकुण 230 प्रवाशांचा मृत्यू झाला. आणि  12 विमानातील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या विमान अपघातात केवळ एक प्रवासी जिवंत राहिला. बाकी विमानातील एकुण 241 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय परिसरातील 29 जणांना आपला जीव गमवावा लागला. 

केंद्रसरकारने शनिवारी या अपघाताची कारणे शोधण्यासाठी एका उच्चस्तरिय समितीची नेमणुक केली आहे. या समितिद्वारे विमान अपघाताची तांत्रिक कारणे, मानवी चूक अन्य काही कारणांचा शोध घेण्यात येणार आहे. त्यासाठी ही समिती काम करणार आहे. नागरी विमान मंत्रालयाने म्हटले आहे की, केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली काम करणारी समिती संबंध एजन्सिकडून केल्या जाणाऱ्या इतर तपासांना पर्याय ठरणार नाही. 

ब्लॅक बॉक्समुळे उघड होऊ शकते सत्य

मोहोळ ( Murlidhar Mohol ) यांनी म्हटले आहे की, चौकशी सुरू आहे आणि अनेक छोट्यात छोट्या गोष्टींची पडताळणी केली जाणार आहे. ब्लॅक बॉक्स डाऊनलोड केल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होई शकतो. या सगळ्याचा अहवाल तीन महिन्यात येणार आहे. त्यांनी सांगितले की, अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स , ज्यात फ्लाईट डेटा रेकॉर्ड आणि कॉकपिट वॉईस रेकॉर्डल असते. हे सर्व रेकॉर्ड अपघाताची कराणं समजण्यासाठी फार महत्त्वाचे ठरणार आहे. मोहोळ यांनी सांगितले की., एअर इंडिया एकुण 34 ड्रिमलायनर विमानांचे संचलन करते. सर्व 34 विमानांंचे परिक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यातील आतापर्यंत 10 ते 12 विमानांचे परिक्षण पूर्ण झाले आहे. त्यात कोणताही बिघाड आढळून आलेला नाही. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored