Translate :

Sponsored

‘हा’ अभिनेता सौरव गांगुलीच्या चरित्रपटात साकारणार मुख्य भूमिका, चाहत्यांमध्ये उत्सूकता : Sourav Ganguly Biopic, Who will be play The Gangulis Charecter ?

Sourav Ganguly Biopic Lead Actor: माजी भारतीय खेळाडू सौरव गांगुलीच्या जीवनावर एक चरित्रपट बनणार आहे.. ‘दादा ऑफ क्रिकेट’ या चरित्र चित्रपटासाठी  बॉलिवूड अभिनेत्याचे नावही निश्चित झाले आहे. सौरव गांगूलीच्या चाहत्यांमध्ये या विषयीची मोठी उत्सूकता आहे, की कोण ही भूमिका साकारणार आहे. 

मुंबई : 26/06/2025

Sourav Ganguly Biopic: भारतीय क्रिकेटमधील एक महत्त्वाचा चेहरा आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांची कहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘क्रिकेटचा दादा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांगुलीच्या आयुष्यावर आधारित जीवनावर बायोपिक बनणार आहे. सौरव गांगुली हा केवळ भारतीय क्रिकेटच्या इतिहासातच नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्येही एक महान खेळाडू म्हणून ओळखला जातो. बायोपिकसाठी मुख्य भूमिकेसाठी नाव आता निश्चित झालं आहे. कोण दादाची भूमिका साकारणार याकडेच सगळ्यांचं लक्ष होतं. आता अखेरीस एक नाव निश्चित करण्यात आलं आहे.

कोण साकारणार  क्रिकेटमधील ‘दादाची’ भूमिका?

या बायोपिकमध्ये राजकुमार राव हा बॉलिवूड अभिनेता सौरव गांगुलीची भूमिका साकारणार आहेत. स्वतः राजकुमार रावने एनडीटीव्हीशी बोलताना यावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्याने हे ही सांगितलं की, तो या भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे, पण त्याचबरोबर ही मोठी जबाबदारी असल्याने थोडासा नर्वसही आहे.

काय म्हणाला राजकुमार?

राजकुमार राव म्हणाला, “हो, मी ही भूमिका करतोय. ही खूप मोठी जबाबदारी आहे, पण त्याचवेळी एक जबरदस्त अनुभवदेखील असणार आहे. मी बंगाली उच्चारांवरही मेहनत घेणार आहे.”

काय म्हणाला सौरभ गांगुली?

सौरव गांगुलीनेदेखील या निवडीला दुजोरा दिला आहे. त्याने म्हटलं, “राजकुमार रावची निवड झाली आहे आणि मला वाटतं, माझी भूमिका निभावण्यासाठी तोच सगळ्यात योग्य आहे.” पुढे तो म्हणाला, “माझ्या बायोपिकसाठी योग्य व्यक्ती निवडली गेली आहे. मी त्याला पूर्ण मदत करणार आहे.”

चित्रपटाच्या शूटिंगचा आणि रिलीजचा प्लॅन

गांगुलीने पुढे सांगितलं की, या बायोपिकचं शूटिंग जानेवारी 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे आणि चित्रपट डिसेंबर 2026 मध्ये थिएटर्समध्ये प्रदर्शित होऊ शकतो.

गांगुलीचं करियर

गांगुलीने 1992 ते 2008 दरम्यान भारतीय संघासाठी क्रिकेट खेळलं. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली. आता त्याची कहाणी रुपेरी पडद्यावर पाहणं क्रिकेटप्रेमींसाठी एक खास अनुभव ठरणार आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored