Translate :

Sponsored

Sindhutai Sapkal Name was Used For Fraud : सिंधूताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर; ममता सपकाळांनी केली पोलखोल !

महाराष्ट्रात सिंधूताई सपकाळ  (Sindhutai Sapkal )  यांचे नाव सामाजिक क्षेत्रात फार मोठे आहे. पण सध्या त्यांच्या नावाचा गैरवापर करून काही नतद्रष्ट लोकं अनेकांची फसवणूक करत आहेत. ही बाब त्यांची कन्या ममता सपकाळ यांनी उघडकीस आणली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी लोकांना सावधान रहाण्याचे आवाहन केले आहे. 

पुणे : 2025-06-01

लग्नासाठी अनाथआश्रमातील मुली दाखवतो, असे सांगून पैसे घेऊन फसवणुक करण्याचे अनेक प्रकरणं होत असतात. काही सामाजिक संस्थांमधील मुली दाखवण्याच्या बहाण्याने हे पैसे उकळण्याचे काम काही जण करतात. मात्र आता अशा केसेस प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ (Sindhutai Sapkal )  यांच्या संस्थेंचे नाव घेऊन होत असल्याचे उघडकीस आले आहे. ही बाब ममता सपकाळ यांनी निर्दशनास आणली आहे. 

सिंधूताई सपकाळ   (Sindhutai Sapkal )यांची लेक ममता सपकाळ यांनी याविषयीची माहीती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी लोकांना फसवणूकीपासून सावधान रहाण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी  पोस्ट मध्ये म्हटले आहे की, आई, पद्मश्री डॉ.सिंधूताई सपकाळ यांच्या नावाचे फेक अकाऊंट सोशल मीडीयावर उघडण्यात येत आहेत. या अकाऊंटवर असे पोस्ट करण्यात येते की, आमच्या संस्थेत लग्नासाठी मुली आहेत. या स्थळांसाठी काही रक्कम ही मागितली जात आहे. मी अशा फसवणूक करणाऱ्याचा शोध घेत आहे. दुसऱ्यांच्या गरजेचा असा गैरफायदा घेणाऱ्या लोकांना कोणतीही भिती का नसते ? 

लोकांनी सावधान रहाण्याचे आवाहन 

ममता सपकाळ यांनी सांगितले की, मी आण माझे बंधू दिपक दादा मिळून एक व्हिडियो तयार केला होता, ज्यात आम्ही हे स्पष्ट केले होते की, आमच्या संस्थेमार्फत सध्या कोणत्याही मुलीचे स्थळ उपलब्ध नाही. सध्याच्या काळात मुलींची कमी असल्याकारणाने, अशा खोट्या जाहिराती देऊन लोकांना फसवले जात आहे. यासाठी आता आम्ही पोलीसांची मदत घेणार आहोत. आम्ही वेळोवेळी याविषयी जागरूक करत रहाणार आहोत. लोकांनीही सावधानता बाळगत, अशा खोट्या जाहिरातींना भूलू नये. 

मुलींची फसवणूक करणाऱ्यांसाठी संदेश

ममता यांनी सांगितले आहे की, आमच्या संस्थेतर्फे ज्या मुलींची लग्ने लावून दिली जातात, ते विवाहसोहळे अगदी घरच्यासारखे केले जातात. त्यासाठी आम्ही कधीही वरपक्षाकडून पैसे आकारत नाही. ज्या अशा जाहिराती आपण पहात अहात, त्या केवळ फसवणूक करणाऱ्या आहेत. सध्या आमच्या संस्थेत कोणतीही मुलगी लग्नासाठी तयार नाही, कारण त्यांचे शिक्षण सुरू आहे. जोपर्यंत या मुली आत्मनिर्भर होत नाही, तो पर्यंत त्यांचे लग्न आम्ही लावत नाही. 

हे कृत्य खेदजनक

पुढील किमान तीन वर्ष आमच्या संस्थेतून कोणत्याही मुलीच्या लग्नाचे नियोजन नाही. जर आमत्या संस्थेचे नाव घेऊन जर कोणी फोटो दाखवून, 15 हजार रूपये ऑनलाईन जमा करायला सांगत असेल, तर हे फार गंभीर आहे. सध्या समाजात मुलींचे प्रमाण कमी असल्याने, जर मुलाकडच्यांची अशी फसवणूक होत असेल तर हे फार निंदनीय आहे. 

सावधानतेचा इशारा आणि खात्री करून घेण्याचे आवाहन

गेल्या चारपाच दिवसात मला अशा जाहिरातींचे स्क्रिनशॉट मोबाईलवर आले आहेत. मी यावर फोन केल्यावर मला सिंधूताई सपकाळ संस्थेकडून बोलत असल्याचे सांगण्यात आले. जेव्हा मी स्वतः सिंधूताईंची मुलगी आहे असे सांगितल्यावर फोन कट करण्यात आला. या फोनचे रेकॉर्डींग माझ्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे लोकांनी आमच्या संस्थेच्या अधिकृत फोन नंबरवर संपर्क करून खात्री करून घ्यावी असे आवाहन, ममता सपकाळ यांनी केले आहे. 

 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored