Sidhu Moosewala Murder Case : बाबा सिद्दीकी आणि सिद्दऊ मूसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोईचे भारतात प्रत्यार्पण होणार आहे. अमेरिकेने अनमोलला हद्दपार केले आहे. इंटोपोलने याबाबत रेड नोटीसही जाहीर केली आहे.
वॉश्गिंटन : 18/11/2025
सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala Murder Case) आणि बाबा सिद्दीकी हत्याकांडाबाबत नवीन माहिती समोर आली आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाला भारतात आणले जाणार आहे. भारतीय तपास यंत्रणा सध्या त्याच्या प्रत्यार्पणाची तयारी करत आहे. अमेरिकेतून त्याला हद्दपार केले जाणार आहे. हे भारतासाठी मोठे यश मानले जात आहे.
अमेरिकेने अनमोलला केले हद्द्पार (Sidhu Moosewala Murder Case)
बाबा सिद्दी हत्या प्रकरणात महाराष्ट्राच्या न्यायालयाने अनमोलविरोधात वॉरंट जाहीर केले होते. त्यानंतर त्याच्याविरोधात इंटरपोलकडून रेड नोटीस देखीर जाहीर करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकीचे पुत्र झीसान सिद्दीकी याने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने अनमोलला हद्दपार केले आहे. ही कारवाई केंद्रीय संस्था आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने संयुक्तपणे केली आहे. या अंतर्गत सध्या अनमोल बिश्नोईला भारतात आणले जात आहे. सध्या तो भारतात असल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कविरोधात हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
या प्रकरणांमध्ये अनमोल बिश्नोई आरोपी (Sidhu Moosewala Murder Case)
अनमोल बिश्नोईवर अनेक हाय प्रोफाईल प्रकरणांच्या हत्यांचे आरोप आहेत. यामध्ये सिद्धू मूसेवाला हत्याकांड, बाबा सिद्दीकी हत्याकांड, सलमान खानच्या घराबाहोर गोळीबार, तसेच अनेक राज्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये अनमोल बिश्नोईचा समावेश आहे. 18 नोव्हेंबर म्हणजे आत सकाळी 10 वाजता अनमोल बिश्नोईला राजधानी दिल्लीत आणले जाणार होते. त्यानंतर त्याला पटियाला हाऊस कोर्टात हजर करणार आहेत.