मुंबई : 2025-05-08
पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्यर देताना नुकतीच भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिम फत्ते केली. मात्र या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात सर्वच स्तरावर सतर्कता पाळली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतीली सिद्धिविनायक मंदिराने (Siddhivinayak Mandir ) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मुंबईतीली या प्रसिद्ध मंदिरात रविवारपासून भाविकांना हार आणि नारळ अर्पण करता येणार नाहीत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे युद्धजन्य परिस्थिती उद्भवलेली आहे. या सगळ्या तणावग्रस्त वातावरणात सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सिद्धिविनायक मंदिर (Siddhivinayak Mandir ) हे भारतातील महत्त्वाच्या अनेक मंदिरांपैकी एक आहे. मुंबईत येणाऱ्या लाखो लोक येथे भेट देत असतात. म्हणून येथे सुरक्षाही तितकीच वाढवण्याच्या हेतूने हा निर्णय घेतला आहे.
सध्या देशात सर्वत्र तणाव आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर ही मोहिम करून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांच्या 9 तळांवर एअर स्ट्राईक करून ते उद्धवस्त केले. या कारवाईत 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले, त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या 15 शहरांमधील लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला. या सगळ्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिराचा (Siddhivinayak Mandir ) हा निर्णय घेतला गेला आहे.