क्रीडा : 2025-05-19
पंजाब किंग्जसचा कर्णधार श्रेयस अय्यर याने आयपीएलच्या या हंगामात नवीन इतिहास घडवला आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer IPL 2025) या स्पर्धेत अशी कामगिरी करणारा पहिलाच कर्णधार ठरला आहे.
काय आहे श्रेयस अय्यरची कामगिरी ?
आयपीएलच्या 18 व्या हंगामात 59 समान्यांपर्यंत प्लेऑफसाठी एकही संघ निश्चित झाला नव्हता. पण 60 व्या समान्यानंतर एकाच वेळी तीन संघांनी प्लेऑफचं तिकीट मिळवलं. रविवारी 18 मे ला राजस्थान रॉयल्स विरूद्ध पंजाब किंग्ज्स आमनेसामने होते. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात पंजाबने विजय मिळवला. पंजाबने राजस्थानसमोर 220 धावांचं आव्हान ठेवलं होते. मात्र राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 209 धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबचा हा आठवा विजय होता. त्यानंतर डबल हेडरसाठी सामन्यात गुजरातने दिल्ली कॅपिटल्सवर 10 विकेटसने विजय मिळवला. दिल्लीने विजयासाठी दिलेले 200 धावांचे आव्हान गुजरातकडून 19 ओव्हरमध्ये पूर्ण केलं गेलं. गुजरातच्या या विजयासाठी आऱसीबी आणि पंजाह किंग्ज्स या संघांनाही प्लेऑफंचं तिकीट मिळवलं. यासह पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने इतिहास घडवला. कारण श्रेयस अय्यर त्याच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या संघांना प्लेऑफमध्ये पोहोचवणारा आयपीएल मधील पहिला कर्णधार ठरला आहे. त्याने 17 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल ट्रॉफीचा मान मिळवून दिला होता. 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्सला त्याने फायनलपर्यंत नेलं होतं.