Translate :

Sponsored

Shivneri Fort Stampede, 2026 : शिवजयंतीच्या दिवशीच शिवनेरीवर मोठी चेंगराचेंगरी, शिवभक्त जखमी : Huge Stampede At Shivneri On The Day Of Shiv Jayanti

शिवजयंतीच्या दिवशीच शिवनेरीवर मोठी चेंगराचेंगरी, शिवभक्त जखमी

Shivneri Fort Stampede : शिवजयंती निमित्त साधून शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर येथील ऐतिहासिक शिवनेरी गडावर मध्यरात्रीपासून शिवभक्तांची अभूतपूर्व गर्दी उसळली.

जुन्नर : 20-02-2026

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती निमित्त दरवर्षी हजारो शिवभक्त शिवनेरी या किल्ल्यावर ( Shivneri Fort Stampede ) येत असतात. शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते. असे असताना यंदा मात्र शिवनेरी गडावरच मोठी चेंगराचेंगरी झाल्याचे समोर आले आहे. या चेंगराचेंगरीत 15 ते 20 शिवभक्त जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज शिवजयंती आहे. त्यामुळे राज्यभरात उत्साहाचे वातावरण असते. या खास दिवशी शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर येथील ऐतिहासिक शिवनेरी गडावर मध्यरात्रीपासूनच शिवभक्तांची अभूतपूर्व गर्दी उसळली. वाढत्या गर्दीमुले नियोजन कोलमडले. याच कारणामुळे शिवनेरी गडावरच चेंगराचेंगरी झाली. यातच काही शिवभक्त जखमी झाले आहेत. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक माहितीनुसार, ही चेंगराचेंगरी गर्दीचे नियोजनच कोलमडल्याने झाल्याचे समोर आले आहे.

शिवजयंतीनिमित्त दरवर्षी हजारोंच्या संख्येने शिवभक्त शिवनेरीवर दाखल झाले होते. मध्यरात्रीपासूनच गडाचा परिसर ‘जय भवानी, जय शिवाजी’, या जयघोषाने दुमदुमून गेला होता. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यानंतर ही चेंगराचेंगरी झाली.

काय घडलं गडावर ? ( Shivneri Fort Stampede )

शिवनेरी गडावरच्या अंबरखाण्याच्या खालच्या हत्ती दरवाजा परिसर आणि गणेश दरवाजा हे मार्ग अत्यंत अरूंद आहेत. शिवभक्तांची मोठी गर्दी होती. त्यातच या अरूंद मार्गांवरून एकाच वेळी हजारो शिवभक्थ जमा झाले. गडावरून खाली उतरणाऱ्या लोकांचा लोंढा मोठा होता. तर खालून गडावर जाणाऱ्या लोकांसाठीच जागाच उरली नाही. अशा स्थीतीत वरून खालच्या दिशेनं येणाऱ्या काही लोकांनी ढकलाढकली केली. रस्ते लहान आणि लोकांची संख्या प्रचंड असल्याने तिथे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. यात काही शिवभक्त खाली पडले आणि जखमी झाले.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored