Sheikh Hasina : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. दरम्यान यावर संयुक्त राष्ट्राने आपली प्रतिक्रीया दिली असून त्यांचे दुटप्पी धोरण दिसून येते आहेत.
ढाका : 18/11/2025
बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने मानवियविरूद्ध गुन्ह्यांच्या आरोपाखाली माजी पंतप्रधान शेख हसीना ( Sheikh Hasina ) यांना मृत्यूदंड सुनावला आहे. यामुळे बांगलादेशात मोठी खळबळ उडाली आहे. हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने या निर्णयाविरोधात संप पुकारला आहे.सध्या बांगलादेशात बिकट परिस्थिती आहे. याच वेळी संयुक्त राष्ट्राने देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामधून संयुक्त राष्ट्रांचे दुटप्पी धोरण समोर आले आहेत. यामधून संयुक्त राष्ट्रांचे दुटप्पी निकष समोर आले आहेत.
हसीनांच्या शिक्षेवर संयुक्त राष्ट्राने काय म्हटले आहे ? ( Sheikh Hasina )
संयुक्त राष्ट्रांनी हसीना यांच्या मृत्यूदंडावर खेद व्यक्त केला आहे. परंतु हा निर्णय अत्यंत निर्णय महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार प्रवक्त्या शामदासानी यांनी यावर अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, हसीना आणि माजी गृहमंत्र्यांविरोधात न्याधिकरण्याच्या निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. पीडियांना त्रास देणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे. पण, आम्हाला या शिक्षेचाही खेद आहे, ज्या सर्व परिस्थितीत संयुक्त राष्ट्र विरोध करते. याशिवाय संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस याच्या प्रवक्त्यांनी देखील पत्रकार परिषदेत, या निवेदनावर सहमती दर्शवली आहे. तसेच कोणत्या परिस्थिती मृत्यूदंडाच्या वापराच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शेख हसीनांना का देण्यात आली मृत्यूदंडाची शिक्षा ? ( Sheikh Hasina )
हसीना यांच्यावर 15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर पोलिस आणि सुरक्षा दलांना प्राणघातक कारवाई कऱण्याचे आदेशचा दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपात ICT ने हसीना यांना दोषी ठरवले आहे. या अंतर्गत मानवाधिकारांचे उल्लघंन केल्याच्या आणि कायद्याच्या गैरवापर केल्याचा आरोपाखाली त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने हसीनासह माजी गृहमंत्री असदुज्जमान खान यांनाही मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. तसेच एका माजी पोलिस प्रमुखाला पाच वर्षांच्या तुरूंगवास सुनावला आहे.