Shahi Tharoor : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर मोहीमेनंतर भारत- पाकिस्तान मध्ये तणाव निर्माण झाला होता. युद्धाला तोंड फुटत असतानाच, भारताने शस्रसंंधीला संमती दिली. या सर्वांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष्य डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) यांनी याच्या मध्येस्थीचे श्रेय लाटले होते. या सर्वं मुद्यांविषयी शशी थरूर यांनी भारताची भूमिका मांडली आहे.
वॉशिंग्टन डीसी : 2025-05-24
भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर भारत-पाक तणाव वाढला होता. त्यातून युद्धाला तोंड फूटत असताना, अचनाक शस्रसंधीचा निर्णय घेण्यात आला. या शस्रसंधीसाठी आपण मध्यस्थी केली असल्याचे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष्य डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) यांनी केले होते. यावर आता कॉंग्रेस पक्षाचे खासदार शशी थरूर ( Shahi Tharoor )यांनी भारताची स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताचे राजकीय धोरण हे कायम संवाद आणि पारदर्शकतेचे राहिले आहे, परंतु कोणाही त्याला मध्यस्थी म्हणून पाहण्याची चूक कधीही करू नका. जर कोणता देश एखाद्या मुद्यावर बोलत असेल, तर त्याला मध्यस्थी म्हणता येणार नाही.
शशी थरूर ( Shahi Tharoor ) हे सध्या आंतरराष्ट्रीय मोहीमेवर आहेत. भारताची राजनैतिकता आणि पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया जगासमोर धाडसाने मांडत आहेत. शशी थरूर हे भारताने देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी परदेशात पाठवलेल्या सात संसदीय शिष्टमंडळांपैकी एकाचे नेतृत्व करत आहेत. थरूर यांचे पथक अमेरिका, पनामा, गयाना, ब्राझील आणि कोलंबियाला भेट देणार आहेत.
या दौऱ्याचा मुख्य उद्देश्य पाकिस्तानची धोरणे जगासमोर आणणे आणि भारताचे मजबूत परराष्ट्रधोरण जागतिक व्यासपीठावर जोरदारपणे मांडणे हा असणार आहे. थरूर यांनी स्पष्ट केले आहे की, ते या दौऱ्यावर कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधी म्हणून नाही, तर देशाचे प्रतिनिधी म्हणून काम करतील.
संवाददाता भारत, मध्यस्थी नाही
डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘युद्धबंदीसाठी भारत आणि पाकिस्तामध्ये मध्यस्थी मी केली’, या विधानावर परत एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. या विधानावर कॉंग्रेसचे खासदार आणि माजी विदेश मंत्री शशि थरूर ( Shahi Tharoor ) यांनी फार कौशल्याने आणि स्पष्ट शब्दात आक्षेप घेत, हे म्हणणे खोडून काढले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताने कधीही भारत-पाक तणावा प्रसंगी मध्यस्थी साठी कोणतीही बोलणी सुरू केली नव्हती. आणि ती स्विकारली सुद्धा नव्हती. थरूर यांनी पुढे म्हटले आहे की, जर एखादा देश भारताशी या दरम्यान संवाद साधत असताना, भारताने जर आपल्या पुढील हलचालींविषयीची माहिती दिली, तर या प्रक्रियेला मध्यस्थी करणे असे म्हणत नाहीत, तर याला संवाद साधणे असे म्हणतात. या स्पष्ट शब्दात त्यांनी देशाची बाजू मांडली आहे. थरूर असेही म्हणाले की. भारताची सर्वात मोठी विदेश नीतीमधील ताकद त्याची पारदर्शकता ही आहे. जेव्हा परराष्ट्रमंत्र्यांनी भारताशी संपर्क केला तर, भारत सरकारने तो सार्वजनिक रूपात मांडला. ही सर्व बोलणी राष्ट्रहितासाठी करण्यात आली होती, ना की कोणत्या तिसऱ्या पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी.
पाकिस्तान विरोधात एकजूट
शशि थरूर ( Shahi Tharoor ) यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनीधी मंडळ अमेरिका, पनामा, गयाना, ब्राजील आणि कोलंबिया या देशात जाऊन पाकिस्तानच्या दहशतवादी भूमिकेला जगासमोर मांडत आहेत. त्यांनी सांगितले की, या प्रसंगी सर्व जग भारताकडे पहात असताना, आपण एकजुटीने पुढे गेले पाहिजे. आपण सर्व संसदीय सदस्य अशावेळी एक आहोत, आणि भारताची बाजू मांडत आहेत हाच उद्देश्य आहे.