Translate :

Sponsored

Sharankumar Limbale, Big News, 2026 : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शरणकुमार लिंबाळे यांची निवड : Sharankumar Limbale is Now President Of The Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शरणकुमार लिंबाळे यांची निवड.

Sharankumar Limbale : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांची निवड झाली आहे. लिंबाळे यांनी साहित्याच्या विविध प्रकारांत लेखन केले आहे. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये सामाजिक इतिहास, जातीव्यवस्था, सांस्कृतिक संघर्ष आणि वंचित समूहांचे जगणे यांचे चित्रण आढळते.

पुणे : 25 -11-2026

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे (Sharankumar Limbale) यांची निवड झाली आहे. आज साहित्य महामंडळाची पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून, शरणकुमार लिंबाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

शरणकुमार लिंबाळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 40 पेक्षा जास्त पुस्तकांचे लिखाण केले आहे. ज्येष्ठ मराठी साहित्यिक, कादंबरीकार आणि समीक्षक अशी त्यांची ओळख आहे.

कोण आहेत शरणकुमार लिंबाळे ? (Sharankumar Limbale)

महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर या गावात 1 जून 1956 ला शरणकुमार लिंबाळे यांचा जन्म झाला. सामाजिक विषमता, जातिव्यवस्थेची उतरंड, अस्पृश्यता आणि विंचित समूहांच्या जगण्यातील संघर्ष यांचे वास्तव त्यांनी बालपणापासून अनुभवले. त्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीत या अनुभवांचा मोठा वाटा राहिला. पुढे याच अनुभवांनी त्यांच्या साहित्याला आशय, दिशा आणि वैचारिक अधिष्ठान दिले.

लिंबाळे यांच्या व्यावयासिक कारकिर्दीची सुरूवात दूरसंचार विभागात टेलिफोन ऑपरेटर म्हणून झाली. त्यानंतर 1986 ते 1992 या काळात त्यांनी आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर उद्धोषक म्हणून काम केले. पुढे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रकाशन विभागात सहाय्य्क संपादक म्हणून त्यांनी काम सुरू केले. विद्यापीठात प्राध्यापक आणि संचालक अशा जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही स्वतंत्र ओळख निर्माण केली.

लिंबाळे यांचे लेखन (Sharankumar Limbale)

लिंबाळे यांनी साहित्यांच्या विविध प्रकारांत लेखन केले आहे. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये सामाजिक इतिहास, जातिव्यवस्था, सांस्कृतिक संघर्ष आणि वंचित समूहांचे जगणे यांचे चित्रण आढळते. ‘उपल्या’, हिंदू, बहूजन, झुंड, सनातन आणि रामराज्य या त्यांच्या महत्त्वाच्या कादंबऱ्या आहेत.

दलित ब्राम्हण, देवता आदमी, हे त्यांचे कथासंग्रह चर्चेत राहिले. उद्रेक, ओ आणि यलगार या कविता आणि काव्यलेखनातूनही त्यांनी सामाजिक वास्ववाला अभिव्यक्ती दिली. त्यांच्या लेखनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव जाणवतो. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठा ही मूल्ये त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी आहेत.

लिंबाळे यांच्या साहित्यिक प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘सनातन’ ही कादंबरी. 2028 मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीतून त्यांनी भारतीय समाजातील जातिव्यवस्थेचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पदर उलगडला. अस्पृश्य समाजाचे जगणे, त्यांचा संघर्ष, इतिहासातील योगदान आणि सामाजिक व्यवस्थेतील स्थान यांची व्यापक मांडणी या कादंबरीत त्यांनी केली आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored