Translate :

Sponsored

Sharad Pawars Health Update, Breaking : शरद पवार यांची प्रकृती बिघडली, पुण्यात उपचार सुरू : Sharad Pawars Health Has Deteriorated He Has Left Baramati And Is Headed Towards Pune

शरद पवार यांची प्रकृती बिघडली, पुण्यात उपचार सुरू

Sharad Pawars Health Update : शरद पवार यांची तब्येत बिघडली असून, त्यांना तातडीने बारामतीतून पुण्यात हलवण्यात आले आहे. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आणि पती सदानंद सुळे हे आहेत.

पुणे : 09-02-2026 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ खासदार शरद पवार (Sharad Pawars Health Update) यांची प्रकृती खालावल्याची  बातमी समोर आली आहे. बारामतीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात त्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. शरद पवार यांना तातडीने रूग्णवाहिकेतून पुण्याच्या दिशेने हलवण्यात आले आहे. त्यांच्यासोबत खासदार सुप्रीया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे हे आहेत.

बारामतीवरून पुण्याकडे रवाना  (Sharad Pawars Health Update)

प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी 10:30 च्या सुमारास दोन तज्ञ डॉक्टरांचे पथक गोविंद बागेत दाखल झाले होते. सुमारे तासभर चाललेल्या वैद्यकीय तपासणीनंतर शरद पवार यांना खोकला आणि कफमुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे समोर आले आहे. प्रकृतीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यातील खासगी रूग्णालयात दाखल कऱण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तातडीने कार्डियाक ॲम्बुलन्स आणि वैद्यकीय पथकाच्या निगराणीत त्यांना घेऊन सुप्रिया सुळे पुण्याच्या दिशेने निघाल्या आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawars Health Update) यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याने शरद पवार हे उपचारासाठी पुण्यातील रूबी क्लिनिकमध्ये दाखल होणार आहेत. सूत्रांनी दिेलेल्या माहितीनुसार, पुढील 30 मिनिटांत शरद पवार रूबी हॉल क्लिनिकमध्ये पोहोचणार असून तिथे त्यांच्यावर तज्ञ डॉक्टकांकडून तपासणी व उपचार करणार आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीबाबात अजून अधिकृत वैद्याकीय माहिती समोर आलेली नाही.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored