Sharad Pawar On Sunetra Pawar News : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर, त्यांच्या राजकीय वारसदार म्हणून सुनेत्रा पवार आज (31 जानेवारी ) राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यावर आता सर्व राजकीय धुरंधर आपले मत मांडत आहेत. पवार घराण्याचे ज्येष्ठ शरद पवार यांनीही याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बारामती : 31-01-2926
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीबाबत (Sharad Pawar On Sunetra Pawar News ) कोणतीही माहिती मिळाली नाही. सध्याची स्थिती आमच्यासाठी आव्हानात्मक आहे. जो गेला त्याला परत आणू शकत नाही. कुणी ना कुणी अजित पवार यांची जबाबदारी घेतली पाहिजे, म्हणून हे निर्णय घेतले जात असावेत, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आहे. ते सकाळी माध्यमांशी बोलत होते.
यावेळी शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणावरही भाष्य केले. शरद पवार म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी अजित पवार यांचीच इच्छा होती. गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनकरणाच्या चर्चा सुरू होत्या. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा सुरू होत्या. येत्या 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाची घोषणा करणार होती. पण अजित पवार यांच्या जाण्याने या विलीनीकरणात खंड पडल्याचे दिसत आहे. जयंत पाटील आता अंतिम निर्णय घेतील असेही स्व.अजित पवार म्हणाले होते.
सध्याची परिस्थिती आव्हानात्मक (Sharad Pawar On Sunetra Pawar News )
तुमच्याच कुटुंबातील सून उपमुख्यमंत्री होणार आहे. हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने एक चांगली बाब आहे, असं वाटत नाही का, या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, जे गेले त्यांना परत आणू शकत नाही. सध्याच्या परिस्थितीचा सामना करणे आमच्यासाठी आव्हानात्मक आहे. सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी, कोणीतरी जबाबदारी घेणे आवश्क आहे. अजित पवारांच्या निधनानंतर लगेचच अनेक राजकीय निर्णय घेण्याच्या घाईबद्दल शरद पवार म्हणाले की, ” या सर्व चर्चा येथे होत नाहीत. त्या मुंबईत होत आहेत. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर वरिष्ठ नेेते या चर्चा करत आहेत. जे दिसत आहे त्यावरून असे दिसते की हे निर्णय त्यांनी घेतले आहेत. मी यावर भाष्य करणार नाही.
हा निर्णय राष्ट्रवादीचा (Sharad Pawar On Sunetra Pawar News )
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की. “हा निर्णय राष्ट्रवादीचा होता. पवार कुटुंबाला विश्वासात घेण्यात आले नाही. आम्हाला यासंदर्भात कोणतीही माहिती नव्हती. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी खूप घाई करण्यात आली असे वाटते का, या प्रश्नावर शरद पवार यांनी उत्तर देणे टाळत, उलट प्रश्न केला की, तुम्ही हे मला का विचारत आहात.
पुढे ते म्हणाले की, पटेल, तटकरे हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि तो त्यांचा अधिकार आहे. अजित पवार यांचे निधन हा राज्यासाठी मोठा आघात आहे. NCP ने काय करावे, हे त्यांच्या पक्षातील नेते ठरवतील. भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली, याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. विलिनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. पण आता खंड पडला.
अपघात हा अपघात असतो (Sharad Pawar On Sunetra Pawar News )
शरद पवार यांनी अपघाताविषयी बोलताना म्हटले की, ” अपघात हा अपघात असतो.” पवार म्हणाले की, नागरी विमान वाहतूक विभाग या प्रकरणाची चौकशी करत आहे. आणि सीआयडी चौकशीचीही घोषणा करण्यात आली आहे. भाजप पक्षासोबतच्या युतीविषयीची शक्यता पवारांनी स्पष्टपणे नाकारली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ” मी भाजपसोबत का जाऊ ? आमच्या विचारसरणी पूर्णपणे वेगळ्या आहेत.” त्यांच्या विधानामुळे भाजपाच्या परिस्थितीत दोन्ही गटांमधील एकता पुढे जाऊ शकते या सर्व अटकळींना पूर्णविराम मिळाला आहे.
This post was last modified on January 31, 2026 12:45 pm