Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात परत एकदा पक्षातील फुटाफुटी बघायला मिळणार आहे. येत्या 8 जूनला शरद पवारांसारख्या (Sharad Pawar ) ज्येष्ठ नेत्याला मोठा धक्का बसणार आहे. त्यांच्या गटातील एक मोठा नेता गटबदल करून,अजित पवारांच्या (Ajit Pawar ) गटात प्रवेश करणार आहे.
महाराष्ट्र : 2025-06-01
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा धक्का बसणार आहे. गेल्या काही दिवसात दोन्ही राष्ट्रवादी गट परत एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र आता शरद पवारांना (Sharad Pawar ) मोठा धक्का मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे. माजी आमदार बाबाजानी दु्र्राणी हे शरद पवार यांचा गट सोडून अजित पवार गटात प्रवेश करणार आहे. या निर्णयाने शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे.
माजी आमदार बाबाजानी दु्र्राणी हे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. येत्या 8 जूनला ते अजित पवार यांच्या उपस्थितीत पाथरीमध्येल आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. पाथरीमध्ये आज बाबाजानी यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याचे जाहीर केले.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी गट परत एकदा एकत्र येणार असल्याचे बोलले जात होते. या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बाबाजानींचा हा निर्णय सूचक म्हणता येईल. येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने शरद पवारांना हा मोठा धक्का असल्याते बोलले जात आहे. येत्या 8 जूनला बाबाजानी दु्र्राणी अजित पवार राष्ट्रवादी गटात प्रवेश करणार आहेत.
दोन्ही पवार एकत्र येणार का ? कधी येणार असे जेव्हा विचारण्यात आले, तेव्हा ते मला माहित नाही, असे शरद पवार (Sharad Pawar ) यांनी म्हटले होते. शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनीही, दोन्ही पवार एकत्र येणार या फक्त चर्चा आहेत. आम्हाला वरिष्ठांकडून तसे काहीही सांगण्यात आले नाही, त्यामुळे या फक्त चर्चा आहेत. दोन्ही पवारांच्या या विधानानंतर बाबाजानींचा गट बदल म्हणजे सध्याकरी दोन्ही पवार एकत्र येणार नसल्याचेच चिन्ह आहे.