Translate :

Sponsored

Sawai Gandhrva Bhimsen Mahotasav, 71th Event, 2025, Great News : समृद्ध परंपरा असणारा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ रंगणार पुण्यानगरीत, 10 ते 14 डिसेंबर : 71th Sawai Gandhrva Bhimsen Event Started 10 to 14 December Pune

डिसेंबरमध्ये रंगणार पुण्यात सवाई गंधर्व महोत्सव

Sawai Gandhrva Bhimsen 79th Event : भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी आपल्या गुरू सवाई गंधर्वांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या या महोत्सवाने आजवर देश-विदेशातील कलाकार आणि रसिकांना भूरळ पाडली आहे. सर्व गायक-वादकांचे लक्ष लागून राहिलेल्या या महोत्सवाची तारीख जाहीर झाली आहे. जाणून घेऊया अधिक माहीती.

पुणे : 25/11/2025

जगप्रसिद्ध हिंदुस्तानी शास्रीय संगीताच्या परंपरेचा वारसा जपणारा 71 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा 10 ते 14 डिसेंबरपर्यंत (Sawai Gandhrva Bhimsen Mahotasav) पुण्यातील मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे भव्य उत्साहात पार पडणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत यावर्षीच्या महोत्सवातील कलाकारांची घोषणा करताना सांगितले की, यंदा निम्म्याहून अधिक कलाकार प्रथमच सवाईच्या मंचावर सादरीकरण करणार आहेत.

श्रीनिवास जोशी म्हणाले, भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांनी आपल्या गुरू सवाई गंधर्वांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या या महोत्सवाने आजवर देश-विदेशातील तितकेच नामांकित कलाकार आणि रसिकांना जोडले आहे. अनुभवी दिग्गजांसोबत अनेक नवे, आश्वासक कलाकारांना संधी देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे आणि यंदाही त्या दृष्टीने महोत्सवाची रचना करण्यात आली आहे. हे

हे कलाकार करणार प्रथमच करणार गायन  (Sawai Gandhrva Bhimsen Mahotasav)

लोकेश आनंद, डॉ.चेतना पाठक, जॉर्ज ब्रुक्स, इंद्रायुध मजुमदार, मेघरंजनी मेधी, डॉ.एल.शंकर यांसारख्या अनेक दिग्गज कलावंत प्रथमच सवाईच्या रंगमंचावर सादरीकरण करणार आहेत. कल्याणी समूह हे यंदाच्या महोत्सवाचे मुख्य प्रस्तुतकर्ते असून किर्लोस्कर समूह, लोकमान्य सोसायटी, मगरपट्टा सिटी ग्रुप, पु.ना.गाडगीळ ॲन्ड सन्स, सुहाना, रांजेकर रिअल्टी आदी प्रायोजकांचे सहकार्य लाभले आहे.

पाच दिवस रसिकांना पर्वणी  (Sawai Gandhrva Bhimsen Mahotasav)

या महोत्सवात पाच दिवस विविध घराण्यांची समृद्ध गायन परंपरा अनुभवायला मिळणार आहे. पहिल्या दिवशी लोकेश आनंद (शहनाई), डॉ.चेतना पाठक, रितेश-रजनीश मिश्रा, पं.शुभेंद्र-सास्किया राव आणि पं.उल्हास कशाळकर सादरीकरण करतील. दुसऱ्या दिवशी ऋषिकेश बडवे, इंद्रायुध मजुमदार, पद्मा देशपांडे आणि जॉर्ज ब्रुक्स-पं.कृष्णमोहन भट मंच गाजवतील, तिसऱ्या दिवशी सत्य सोलंकी, श्रीनिवास जोशी, उस्ताद शुजात हुसैन खान आणि डॉ. अश्विन मिडे-देशपांडे सादर करतील. चौथ्या दिवशी सिद्धार्थ बेलमण्णू,अनुराधा कुबेर,पं,रुपक कुलकर्णी, डॉ.भरत बलवल्ली, कला रामनाथ-जयंती कुमरेश आणि मेघरंजनी मेध रंग भरतील. शेवटी पं.उपेंंद्र भट आणि ‘अध्ये’सामूहिक गायन होणार आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored