Santosh Deshmukh Murder Case : माणुसकीला काळिमा फासणारी घटना म्हणजे, बीड मधील संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरणा. बीड जिल्हा या क्रूर घटनेपासून सतत चर्चेत आहे. सध्या या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू आहे. वाल्मिक कराड हा यातील मुख्य आरोपी आहे. त्याच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.
बीड : 22/12/2025
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या हत्येनंतरच्या फोटोंनी तर प्रत्येकाच्या मनात संताप उफाळून आला. या हत्येनंतर बीड जिल्हा चर्चेत आहे. बीडमधील मारहाणीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. . संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तिय वाल्मिक कराड याचे नाव आल्याने धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप करण्यात आले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजनामा दिला.
या सर्व प्रकऱणाच्या पार्श्वभूमिवर, आता वाल्मिक कराडला मोठा धक्का मिळाला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकऱणात वाल्मिक कराड याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने महत्त्वपूर्ण निष्कर्ष नोंदवत आरोपी वाल्मिकी कराडचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
काय म्हटले आहे निकालात ? (Santosh Deshmukh Murder Case)
या निकालात म्हटले आहे की, वाल्मिक कराड याचा खंडणी त्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांचे केलेले अपहरण आणि हत्या यामध्ये कॉल डेटा रेकॉर्ड, मोबाईल वरील संभाषण, कराड आणि इतर आरोपींमधील सततचा संवाद, जप्त केलेल्या व्हिडिओ क्लिप्स, आवाजाच्या नमुन्यांच्या सत्यतेची पुष्टी, प्रयोग शाळेतील अहवाल या पुराव्यांच्या आधारे सहभाग असल्याचे दिसत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळला आहे.
वाल्मिक कराडचा खंडणी, संतोष देशमुख यांचे अपहरण आणि खुनामध्ये सर्व पुराव्यांवरून सहभाग दिसत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटले आहे. आणि त्यामुळे कराडचा जामीन फेटाळला आहे. संतोष देशमुख खून प्रकरणात वाल्मिक कराड याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता. तो फेटाळला गेल्याने वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याला मोठा धक्का बसला आहे.
This post was last modified on December 22, 2025 2:56 pm