Translate :

Sponsored

Sandhya Shantaram Passed Away, Sad News 2025 : ‘पिंजरा’ मधील अखेरचा तारा निखळला ! संध्या शांताराम यांचे निधन..

ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे वयाच्या 97 व्यावर्षी वृद्धापकाळाने निधन.

Sandhya Shantaram : ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे. ‘पिंजरा’ चित्रपटातील एका पेक्षा एक लावणीने रसिक प्रेक्षकांना भूलवले, अशा नृत्यांगणा आणि अभिनेत्रीच्या जाण्याने ‘पिंजरा’ चित्रपटाच्या पर्वाची अखेर झाली.

मुंबई : 04/10/2025

ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम (Sandhya Shantaram) यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले. मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या ‘पिंजरा’ चित्रपटामुळे त्या रसिक प्रेक्षकांना कायम लक्षात रहातील. काल संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठ प्रसिद्ध दिग्दर्श्क व्ही.शांताराम यांच्या संध्या शांताराम या द्वितीय पत्नी होत्या. त्यांनी मराठीसह हिंदी सिनेमांमध्येही स्वतःची ओळख निर्माण केली होती. आता त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण चित्रपट विश्वावर शोककळा पसरली आहे. शनिवारी सकाळी साडे दहा वाजता परळी येथील राजकमल स्टूडीओमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यांच्या पार्थिवार शिवाजी पार्क येथील वैकुंठधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

किरण शांताराम यांनी दिली माहिती  (Sandhya Shantaram Passed Away)

व्ही. शांताराम यांचा मुलगा किरण शांताराम यांनी संध्या शांताराम यांच्या निधनाची माहिती दिली. ‘गेल्या काही दिवसांपासून संध्या या आजारी होत्या. काल संध्याकाळी त्यांचे निधन झाले. आज सकाळी त्यांचे अत्यंसंस्कार झाले.’ असे किरण शांताराम यांनी सांगितले.

संध्या शांताराम यांची चित्रपट कारकिर्द (Sandhya Shantaram Passed Away)

मराठी चित्रपटसृष्टीमधील एक मैलाचा दगड म्हणून ‘पिंजरा’ चित्रपटाकडे पाहिले जाते. या सिनेमातील त्यांच्या बहारदार नृत्यामुळे अभिनेत्री संध्या शांताराम त्याकाळी घराघरांत पोहोचल्या होत्या. महाराष्ट्रातील प्रेक्षकांना या चित्रपटातील गाणे, आणि संध्याबाईंच्या गाण्याने अक्षरशः वेड लावले होते. संध्या शांताराम आणि पिंजरा हीच त्यांच्या ओळख आयुष्यभर ठळक राहिली. असे असले तरीही, त्यांनी अभिनय केलेले ‘दो आँखे बारह हाथ’, ‘झनक झनक पायल बाजे’, जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी उल्लेखनीय भूमिका केल्या. मात्र पिंजरा या चित्रपटातील त्यांची भूमिका अजरामर झाली.

आशिष शेलार यांनी वाहिली श्रद्धांजली (Sandhya Shantaram Passed Away)

आशिष शेलार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून संध्या शांताराम यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ” भावपूर्ण श्रद्धांजल!” ‘पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप पाडली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आँखे बारह हाँथ’ आणि विशेषतः ‘पिंजरा’ चित्रपटातील त्यांची अजरामर भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो !’

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored