saint Tukaram Maharaj palakhi sohala 2025 : आज देहू नगरी विठ्ठल आणि तुकोबांच्या गजराने दुमदुमली..टाळ-मृदुगांच्या तालावर वारकरी ठेका धरत पंढरपूरकडे प्रस्थान करते झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तुकोबांच्या पादुकांची पूजा केली.
देहू : 2025-06-18
जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचा 340 वा पालखी प्रस्थान सोहळा आज मोठ्या उत्साहाने पार पडला. सर्वत्र भक्तिमय आणि अध्यात्मिक वातावरण आहे. याच वातावरणात, तुकोबा आणि विठ्ठलाच्या नामगजरात अवघी देहू नगरी दुमदुमली. सकाळपासूनच हजारोच्या संख्येने वारकरी मंडळी देहूत दाखल झाली. टाळ मृदुंगाच्या तालावर वारकरी ठेका धरत, विठ्ठल भक्तीत तल्लीन झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम महाराजांच्या पादुकांची बूजा केली. त्यानंतर पालखीचे प्रस्थान झाले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी या पालखी प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावतात. आजपासून या सोहळ्याला सुरूवात झाली. मुख्य मंदिराजवळील शिळा मंदिराच्या समोर भाविकांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. टाळ मृदुंगाच्या गजरात तुकोबांचे नामस्मरण केले. अभंग, ओव्या म्हणत वारकरी पंढरीच्या दिशेन निघाले. इंद्रायणी नदीमध्ये पवित्र स्नान केल्यानंतर तुकोबांच्या दर्शनासाठी वारकरी रांगेने उभे रगात, नामस्मरणात दंग झाले.