Russia Plane Crash : रशियाचे एक प्रवासी विमान रशिया-चीन सीमेवर कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सर्व 43 प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत.
रशिया : 24/07/2025
रशियात एक मोठा विमान अपघात ( Russia Plane Crash ) झाला आहे. अपघात इतरा भीषण होता,की या अपघातात सर्वच्या सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. रशियाचे एक प्रवासी विमान अमूर भागात कोसळले आहे. या विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोल रूमशी संपर्क तुटल्यानंतर , ते अचानक गायब झाले. ज्यावेळी या विमानाचा संपर्क तुटला त्यावेळी ते रशियाच्या पर्व अमूर क्षेत्राजवळ होते.
एंगारा एअरलाईन्सच्या An-24 विमानात एकुण 43 प्रवासी प्रवास करत होते. या विमान अपघातात सर्वच्या सर्व 43 प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे. दुर्दैव म्हणजे हे विमान आपल्या निश्चित स्थळाजवळ पोहोचत असतानाच, त्याचा अपघात झाला.
बचावकार्य आणि शोधमोहीम सुरू (Russia Plane Crash )
स्थानीय आप्तकालीन विभागाच्या माहितीनुसार, सिबेरिया आधारित एंगारा एअरलाईन चे हे विमान अमूर भागातील टिंडा शहराच्या जवळ पोहोचले होते. त्यावेळी ते रडार स्क्रिनवरून गायब झाले. क्षेत्रिय गव्हर्नर वासिली ओरलोव यांनी सांगितले आहे की, प्राथमिक माहितीनुसार, विमानात 43 प्रवासी होते. त्यातील 5 लहान मुलं आणि ६ क्रू मेंबर होते. विमानाचा संपर्क तुटल्यानंतर बचावकार्य आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. अपघातामुळे तयार झालेला ढिगारा उपसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रशियातील सरकारी न्युज चॅनेलकडून अपघाताचा एक व्हिडियो दाखवण्यात आला आहे. त्यात सायबेरिया स्थित एअरलाईनद्वारा संचलित विमान उतरताना धुळ आणि धूरात पूर्णपणे झाकले गेले आहे. रिपोर्टनुसार विमानाच्या धडाला आग लागलेली होती. विमानाचे अवशेष अमूर क्षेत्रात सापडले आहेत. दुसऱ्या एका व्हिडीओनुसार हे विमान जंगलात कोसळल्याचे (Russia Plane Crash ) दिसून येत आहे.