Translate :

Sponsored

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash, Shocking News 2026 : रोहित पवार यांचा धक्कादायक दावा, पायलटच्या मदतीनेच अजितदादांचा घात ! : Ajit Pawar Plane Crash Rohit Pawar Press Conference In Mumbai Revealed Things

रोहित पवार यांचा धक्कादायक दावा, पायलटच्या मदतीनेच अजितदादांचा घात !

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात एकाच विषयाची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी आता अनेक गंभीर आरोप केले आहेत.

हा अपघात नसून, ‘घातपात’ असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला, विमानात अवाजवी इंधन भरणे आणि पायलटची संशयास्पद भूमिका यावर त्यांनी संशय व्यक्त केला आहे. स्फोटाचे कारण अधिकचे इंधन असल्याते सांगत, रोहित पवारांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मुंबई : 19-02-2026 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांचं 28 जानेवारीला (Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash)  बारामतीजवळ विमान अपघातात निधन झालं. मुंबईहून सभेसाठी जात असताना त्यांचं विमान बारामती विमानतळाजवळ आल्यावर एका बाजूला झुकलं आणि खाली कोसळलं. त्यानंतर मोठ्टा स्फोट होऊन आग लागली आणि त्यानंतर आणखीही स्फोट झाले. यामध्ये अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यासह अजित पवार यांते सुरक्षारक्षक विदिप जाधव, विमानाचे पायलट सुमीत कपूर, शांभवी पाठक तसेच फ्लाईट अटेंडट पिंकी माली या पाच जणांचा मृत्यू झाला.

हा अपघात नसून घातपात आहे अशा संशय अनेकांनी व्यक्त केला आहे. (Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash) अजित पवारांच्या पक्षातील काही नेते, अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनीही घातपाताची शंका व्यक्त केली असून गेल्या आठवड्यात त्यांनी मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्दे मांडले. याच पार्श्वभूमिवर त्यांनी आजही मुंबईतील वाय बी चव्हाण सभागृहात आणखी एक पत्रकार परिषद घेत दादांच्या विमानाचा घातपातच असावा असा दावा केला. पायलटच्या मदतीनेच अजितदादांचा घातपात झाला अशा आरोपही त्यांनी यावेळी केला.

रोहित पवार काय म्हणाले ?  (Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash)

एखादा बॉल जर मातीत पडला तर तो कमी आदळतो, पण तो टणक रस्त्यावर पडला, तर तो जास्त आदळून टप्पे घेतो. आपण जर अपघात स्थळ पाहिलं तर अजित दादांच जे विमान होते, कडक सरफेसवर पडलं, रनवेवर पडलं नव्हतं. तर एका साईडला पडलं होते. त्यामुळे ते जोरात आदळलं. आता त्यांच्या विमानाचा स्फोट का झाला याबद्दल शंका घेतली जात आहे,  ती शंका आता खरी ठरताना दिसत आहे. दादांच्या विमानात जे फ्यएल टॅंक होते, ते अधिकचे होते. खरंतर विमानात टॉयलेटच्या बाजूला फ्यूएल टॅंक असतात. त्याच्या बाजूला ब्लॅक बॉक्स असतो, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

आणि हे विमान जेव्हा मुंबईवरून बारामतीला गेलं तेव्हाच ते फ्यूएल टॅंक भरले होते. पण मग फ्यएल टँंक पूर्ण भरायची गरज नसते. बारामतीला दादांनी सोडल्यावर विमान पुढे जाणार होतं, मग पुढे हैद्राबादला जाऊन विमानात इंधन भरता आलं असतं. कोणी असं म्हणेल की महाराष्ट्रात इंधन स्वस्त असतं, म्हणून भरलं असेल तर मग इथल्यापेक्षा गुजरातमध्ये त्याहीपेक्षा स्वस्त होतं असा युक्तीवाद रोहीत पवार यांनी केला आहे.

त्यामुळे विमानत एवढं इंधन घेऊन बारामतीच्या दिशेन जाण्याचं कारण काय ? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. मुद्दाम पायलटचा वापर करून घातपात झाला असावा असा मोठा रोहित पवार यांनी केला. विमानात फ्युएल जास्त असलं, तर स्फोट मोठा होईल ही शंका खरी ठरत आहे, असेही ते म्हणाले.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored