Translate :

Sponsored

Rinku Rajguru, New Moive Released : रिंकू राजगुरू एका नव्या भूमिकेत झळकणार ! ‘ आशा’ चित्रपटाचा टिझर वेधून घेतोय लक्ष : Rinku Rajguru New Marathi Mocie Asha Teaser Released

रिंकू राजगुरूचा ' आशा ' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Rinku Rajguru : रिंकू राजगुरू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. तिचा नवीन चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. नुकताच तिच्या आगामी ‘आशा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

मुंबई : 20/11/2025

एका वेगळ्या विषयावरचा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रेक्षकांना विशेषतः महिलावर्गासाठी प्रेरणा देणारा एक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. हा चित्रपट म्हणजे ‘आशा’. या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांची लाडकी ‘आर्ची’ म्हणजे रिंकू राजगुरू एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

“बाई अडलीले… म्हणूनच ती नडलीये” या प्रभावी टॅगलाईनसह ‘आशा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, हा चित्रपट 19 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रदर्शनापूर्वीच ‘आशाने’ ने प्रेक्षकांची मने जिंकून घेण्यास सुरूवात केली आहे. 61 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पुरस्कारावर आपले नाव कोरून चित्रपटाने समिक्षकांची दाद मिळवली आहे.

चित्रपटाचे मुख्य कथानक  (Rinku Rajguru new moive )

चित्रपट महिलांची जिद्द, त्यांचा संघर्ष, आत्मविश्वास आणि समाजावरील जबाबदाऱ्या अत्यंत संवेदनशीलपणे मांडल्या आहेत. कथानकाचा आत्मा असणारी ‘आशा सेविका ‘ ही भूमिका रिंकू राजगुरूने साकारली आहे. तिच्यासोबत सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते हे कलाकारही महत्त्वपूर्ण भुमिकेत दिसणार आहे.

रिंकूची ‘आशा’ ही केवळ आरोग्य कर्मचारी नसून प्रत्येक स्रीचा आधार, मार्गदर्शक आणि निर्भय आवाज आहे. तिच्या नजरेतून जाणवणारा संघर्ष आणि परिस्थितीशी दोन हात करताना दिसणारी तिची ठाम भूमिका हा चित्रपटाचा मुख्य आधार स्तंभ आहे.

दिग्दर्शक दिपक पाटील म्हणाले (Rinku Rajguru new moive )

“आशा” हा फक्त आशा सेविकांचा चित्रपट नाही, तर घर सांभाळत घराबाहेर पडून स्वतःची स्वप्न पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्रीची गोष्ट आहे. नवनवीन विषयांना नेहमीच उघड्या मनाने स्वीकारणाऱ्या मराठी प्रेक्षकांना ही अनोखी आणि संवेदनशील कथा निश्चित आवडेल.

‘आशा’चे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दीपक पाटील असून मुरलीधर चटवानी व रविंद्र अवटी सहनिर्माते आहेत. पॅनोरमा स्टुडीओजच्या माध्यमातून प्रदर्शित होणारा हा चित्रपट आगळ्यावेगळया कथानकावर आधारित आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored