IPL Final 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ने IPL च्या 18 व्या सीजनचे विजेतेपद मिळवले. या अविस्मरणीय प्रवासात टिमच्या प्रत्येक सदस्याचा मोठा वाटा होता. सगळ्यांनीच आपला उत्तम खेळ दाखवत, या विजयात आपले योगदान दिले . रंगतदार वातावरणात हा अंतिम सोहळा पार पडला. विजयानंतर भारताचा लाडका फलंदाज विराट कोहली भावूक झालेला पहायला मिळाला. RCB च्या या विजयाची एक झलक…
आयपीएल : 2025-06-04
तब्बल सतरा वर्षांची प्रतिक्षा संपली आणि विराट कोहलीच्या हाती IPL ची ट्रॉफी विराजमान झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ने IPL च्या 18 व्या सीजनमध्ये आपल्या नावावर पहिल्यांदाच ट्रॉफी नोंदवली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर मंगळवारी हा फायनलचा रंगतदार सामना पार पडला. पंजाब किंग्जला 6 धावांनी पराभूत करत RCB ने आपल्या नावावर पहिली ट्रॉफी जिंकली. आणि पंजाब किंग्ज विजेपदाने हुलकावणी दिली.
RCB ने यावर्षी ऑक्शननंतर रजत पाटीदारच्या हातात टीमची धुरा सोपवली होती. IPL मध्ये पहिल्यांदाच कप्तानी करत असणाऱ्या रजत ने आरसीबीला 14 पैकी 11 मॅचचे विजेतेपद मिळवून दिले. यापैकी 9 मॅच मध्ये 9 वेगळेवेगळे खेळाडू मॅन ऑफ द मॅच विनर ठरले हे विशेष.
विराट कोहलीसाठी ही मॅच फार खास ठरली. ICC साठी सगळ्या ट्रॉफी जिंकणाऱ्या विराट कोहलीला आयपीएलचे विजेतेपद मात्र दरवर्षी हुलकावणी देत होतं. त्याच्यासाठी हे स्वप्न पूर्ण झालं.
IPL 2025 ची काही वैशिष्ट्ये :
- फायनलमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जशी आरसीबीची लढत होती. दोन्ही संघ पहिल्यांदाच विजयी होत ट्रॉफी पटकावण्यासाठी प्रयत्न करत होते. बंगळुरूने पंजाबच्या टिमला 6 धावांनी हरवलं आणि ट्रॉफी मिळवली.
- भारतासाठी आयसीसी च्या सर्व ट्रॉफी जिंकणाऱ्या विराट कोहलीकडे 2024 पर्यंत आयपीएलची ट्रॉफी नव्हती. त्यावरून विराटला बरंच ट्रोल करण्यात आले. परंतु कोहली ने RCB ची साथ सोडली नाही. आणि फ्रँचाइजीनेसुद्धा विराटला सोडले नाही हे विेशेष. आरसीबीने कोहलीला 21 करोड देऊन रिटेन केले. टिममध्ये कोहली टॉप स्कोअर करणारा खेळाडू आहे.
- आरसीबी टिम ही आयपीएल मधील निवडक टिम मधील एक खास टिम मानली जाते. आत्तापर्यंत ही टीम तीन वेळा फायनल पर्यंत पोहोचली. मात्र 2025 ला अखेर विजेतेपद मिळाले. आरसीबीने 2009, 2011, 2016 या तीनही वर्षी फायनल खेळल्या. मात्र तीनही वर्षी अपयश मिळाले.
- आरसीबीचा मालक कोण ? अशी चर्चा नेहमी होते. विजय मल्ल्या हे नाव सर्वांना वाटत असले तरी, गेल्या काही वर्षांपासून मल्ल्या आरसीबीचे मालक नाहीत. युनायटेड स्पिरिटस लिमिटेड नावाच्या कंपनीकडे आरसीबीची मालकी आहे. ही एक मोठी मद्य उत्पादक कंपनी आहे. युनायटेड चेअरमन महेंद्र कुमार शर्मा (MK Sharma ) हे आहेत.