आयपीएल मधील आरसीबीच्या यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आलेल्या 8 फॅन्सचा मृत्यू झाला. मात्र तरीही चिन्नास्वामी स्टेडीयम ( Chinnaswamy Stadium ) येथील RCB सेलिब्रेशन थांबले नाही.
बंगळूरू : 2025-06-04
यंदाच्या आयपीएल 2025 च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्सने बाजी मारत काल ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या यशाचा आनंद साजरा कऱण्यासाठी आणि खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी आज बंगळूरू मधील एम. चिन्नास्वामी स्टेडीयममध्ये ( Chinnaswamy Stadium )कार्यक्रम होता. मात्र RCB च्या फॅन्सनी येथे इतकी गर्दी केली, की त्याठिकाणी चेंगराचेंगरी झाली, या घटनेत एकुण 8 जणांचा मृत्यू झाला. अनेक लोक जखमी झाले आहेत. मात्र तरीही स्टेडियममधील सेलिब्रेशन थांबवले गेले नाही.
आरसीबीचे यश साजरे करण्यासाठी हजारोच्या संख्येने लोंक स्टेडीयम बाहेर उभे होते. एम चिन्नास्वामी स्टेडीयम 50 हजार प्रेक्षकांना सामावून घेते. म्हणजेच यापेक्षाही जास्त संख्येने लोकं तेथे हजर होते. अनेक लोकं स्टेडियम बाहेरून आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. सोशल मीडियावरील अनेक व्हिडियोंमध्ये दिसून येत आहे की, अनेकजण झाडांवर चढून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते.
11 जणांच्या मृत्यूनंतरही सेलिब्रेशन थांबले नाही.
आयपीएल 2025 च्या हंगामाचे विजेतेपद मिळवल्यानंतर एम. चिन्नास्वामी स्टेडीयमच्या बाहेर होणाऱ्या विजय मिरवणूकीमध्ये सामील होण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. मात्र झालेल्या चेंगराचेंगरीत काही लोकांचा मृत्यू होऊनही आरसीबीच्या खेळाडूंचे सेलिब्रेशन थांबले नाही. खेळाडू आपल्या जिंकलेल्या ट्रॉफीसह ग्राऊंडला चक्कर मारताना दिसले. तसेच विराट कोहलीने फॅँन्सशी संवाद साधल्याचेही दिसून आले.
आयपीएल चेअरमन काय म्हणाले ?
एम. चिन्नास्वामी स्टेडीयमवर झालेले 8 जणांच्या मृत्यूविषयी आयपीएल च्या चेयरपर्सन चा खुलासा आला आहे. आयपीएल चेयरमन अरून धूमल यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, हा कार्यक्रम भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआई) किंवा आयपीएल ने आयोजित केेलेला नव्हता. हा कार्यक्रम आरसीबीने आयोजीत केला होता.
चेंगराचेंगरीचे कारण
18 वर्षांच्या प्रतिक्षे नंतर मिळालेल्या विजयामुळे आरसीबीच्या फॅन्समध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. आज (4जून) ला होणाऱ्या विजय मिरवूणीत सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोकं आले होते. त्याच दरम्यान थोडा पाऊस झाल्यामुळे, पावसा पासून वाचण्यासाठी लोकं इकडे तिकडे धावू लागले. त्यातून चेंगराचेंगरी झाली. त्यातून 11 जणांचा मृत्यू आणि काही लोकं जखमी झाल्याचे वृत्त आहे.