Translate :

Sponsored

भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड . : Ravindra Chavhan Appointed As BJP Maharashtra Chief !

 Ravindra Chavhan  : भाजपाला अखेर महाराष्ट्रासाठी प्रदेशाध्यक्षपदी योग्य व्यक्ती मिळाली आहे. रविंद्र चव्हाण यांची महाराष्टर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. 

मुंबई : 01/07/2025

महाराष्ट्रात भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची धुरा कोण सांभळणार याची सर्वांनाच उत्सूकता होती. आज (1 जुलै) भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. 

बिनविरोध निवड

मुंबई महानगरपालिकेची निवडणुक तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला राज्यात एक कायमस्वरूपी प्रदेशाध्यक्ष मिळावा, अशी भावना व्यक्त केली जाऊ लागली. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षपदासाठी योग्य व्यक्तीचा शोध सुरू होता. रविंद्र चव्हाण यांच्याकडे आगोदरपासूनच महाराष्ट्र भाजपाचे कार्यकारी अध्यक्षपद होते. त्यामुळे तेच या पदासाठी योग्य व्यक्ती असल्याचे भाजपात बोलले जात होतेय त्यामुळे भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी चव्हाण यांचे नाव दिल्लीला पाठवण्यात आले होते. या निवड प्रक्रियेत अन्य कोणत्याही नेत्याने अर्ज न केल्यामुळे रवींद्र चव्हाण यांची आज भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. 

रवींद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास

रवींद्र चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचे सक्रिय नेते आहेत. सर्वप्रथम 2007 ला ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडूण आले. नंतर 2009 ला विधानसभा निवडणूक लढवून ते आमदार झाले. त्यानंतर 2014 ला त्यांनी दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली. त्यानंतर ते आमदार असताना कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, ठाणे, पनवेल महापालिकेत भाजपाला यश मिळालेलं पहायला मिळाले. 

2024 ला चौथ्यांदा आमदार

रविंद्र चव्हाण हे पालघरचे पालकमंत्री होते. 2019 ला रविंद्र चव्हाण हे तिसऱ्यांदा आमदार झाले. 2021 ला त्यांना मंत्रीपद देण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे ते मंत्री होते. त्यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. रविंद्र चव्हाण 2024 ला चौथ्यांदा आमदार म्हणून विधानसभेत गेले. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored