China-America Rare Minerals Business Deal : चीन आणि अमेरिका यांच्यात एका प्रमुख कराराविषयी एकमत झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, चीनकडून दुर्लभ खनिजांची पूर्ती करून घेण्याच्या बदल्यात अमेरिका चीनच्या विद्यार्थ्यांना आपल्या विद्यापिठांमध्ये शिकण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे.
लंडन : 2025-06-11
अमेरिका आणि चीन मध्ये नुकताच एक महत्त्वाचा करार झाला आहे. या करारानुसार अमेरिका चीनकडून दुर्लभ मृदा खनिजं (रेयर अर्थ मिनरल्स ) आणि चुंबक ( मॅग्नेटस् ) आयात करणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी ही घोषणा केली. त्यांनी म्हटले आहे की, या खनिजांच्या बदल्यात आम्ही चीनच्या विद्यार्थ्यांना आमच्या देशातील विद्यापिठांमध्ये येऊन शिक्षण घेण्याची परवानगी देणार आहोत. असेच या करारात म्हटले आहे. तसेच या करारनुसार चीनकडून आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंवरचा कर शुल्क (टैरिफ) वाढवून 55 टक्के इतरा करण्यात येणार आहे.
नुकतेच चीनच्या शिनजियांग प्रांतात पुरवठा साखळीपद्घतीने काम करणाऱ्या कामगारांकडून जबरदस्तीने काम करून घेण्यात आल्याची काही प्रकरणे घडली आहेत. यात अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची भूमीका संशयास्पद आहे. अशा सगळ्या संदिग्ध वातावरणात हा करार होत आहे. ग्लोबल राईटस कंप्लायंस नावाची एक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, शिनजियांग मध्ये खनिजांचे खोदकाम करताना मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक मजुरांना बळजबरीने कामाला भाग पाडण्यात येत आहे.
Table of Contents
या कंपन्यांवर लावण्यात आलेले आरोप
एका अहवालानुसार एवन, वॉलमार्ट, नेस्कॅफे, कोका-कोला, आणि शेरविन-विलियम्स सारख्या मोठ्या कंपन्यांवर आरोप लावण्यात आले आहेत की, या कंपन्या चीनच्या टाईटेनियम आणि अन्य खनिज कामांसंबंधीच्या पुरवठा साखळीशी संबंधीत आहे. या अहवालात म्हटले आहे की, शिनजियांग क्षेत्रामध्ये 77 कंपनी टाईटेनियम, लिथियम, बेरिलियम आणि मॅग्नेशियम सारख्या खनिज उद्योगांमध्ये काम करत आहेत. तिथे श्रमिक हस्तांतरण कार्यक्रमाच्या अंतर्गत बळजबरीने कामगारांकडून कामं करून घेण्याचा धोका वाढतो.
अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप स्विकार नाही
चीन ने या सर्व आरोपांचे खंडण केले आहे. चीनने म्हटले आहे की, शिनजियांगच्या प्रकरणासंबंधी जे बळजबरी काम करून घेत असल्याचे आरोप लावले जात आहेत , ते प्रमुख्याने पश्चिमी राष्ट्रांकडून लावण्यात आले आहेत. चीनने स्पष्ट सांगितले आहे की, आमच्या अंतर्गत गोष्टीत हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. विदेश मंत्रालयाने हा आरोप खोटा असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेने आधीच उईगर फोर्स्ड लेबर ॲक्टच्या माध्यमातून शिनजियांग कडून येणाऱ्या उत्पादनांवर सक्त बंदी घातलेली आहे. आणि आता ॲल्युमिनियम आणि समुद्री खाद्यपदार्थांवरही बंदी घालण्यात आली आहे.
चीनच्या निर्यातीमध्ये 34.5 टक्क्यांची घट
अमेरिका आणि चीन यांच्यात परस्पर आयात शुल्कासंबंधात (रेलिप्रोकल टैरिफ) कित्येक दिवसांपासून तणाव चालू आहे. याच्या परिणाम स्वरुप कोरोना साथीनंतर चीनच्या निर्यातीमध्ये 34.5 टक्के इतकी घट झाली आहे. त्यानंतर आता 5 जूनला डोनाल्ड ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्याशी फोनवरून संवाद साधला. चीन आणि अमेरिकेत असणाऱ्या तणावार मार्ग काढण्यासाठी एख बैठक घेऊन योजना आखण्यासंबंधीची सहमती झाली आहे.
अमेरिका -चीन व्यापार युद्ध समाप्त
लंडन मध्ये चीन आणि अमेरिका प्रतिनिधींच्या मध्ये झालेल्या संवादानुसार दोन्ही देशांकडून टैरिफ वादाला पूर्णविराम देण्याचे ठरवले आहे. त्यासह चीन ने अमेरिकेला दुर्लभ खनिजांचा पुरवठा करण्याचा करार केला आहे. लंडन मध्ये या दोन्ही देशांमधील संबंध पुर्ववत होत असल्याचे दिसून येत आहे.