Translate :

Sponsored

Rajiv Gandhi Zoological Park, New Ticket Rate : राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या तिकीट दरवाढीला महापालिकेची मंजुरी ; नवीन दर घ्या जाणून : Muncipal corporation Has Approved The Increase In Ticket Prices Of Rajiv Gandhi Zoo

राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या तिकीट दरवाढीला महापालिकेची मंजुरी

Rajiv Gandhi Zoological Park Ticket : कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्र आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने तिकीट दरात तब्बल 50 टक्क्यांनी वाढ करण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

पुणे :  15/11/2025

कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्र आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने तिकीट दरात तब्बल 50 टक्क्यांनी वाढ करण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. प्राणीसंग्रहालयात नवीन प्राणी दाखल होणार असतानाच या निर्णयाची अंमलबजावणी कऱण्यात येणार आहे.

काय म्हणाले आयुक्त नवल किशोर राम (Rajiv Gandhi Zoological Park )

पुण्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, प्राणी संग्रहालयासाठी महापालिकेकडून होणार खर्च, मिळणाऱ्या महसुलाच्या तुलनेत अनेक पटीने अधिक आहे. प्राण्यांच्या अन्नाचा खर्च, कर्मचाऱ्यांच्या वेतन, देखभाल आणि विस्तार योजनांवर मोठा निधी खर्च होत आहे.

असे असतील नवे तिकीट दर ( Rajiv Gandhi Zoological Park )

नवीन दरांनुसार प्रौढांसाठी तिकीट 40 रुपयांवरून 60 रूपये, मुलांसाठी 10 रूपयांवरून 20 करण्यात आले आहे. परदेशी पर्यटकांना 100 ऐवजी 150 आकारले जातील. खासगी शाळांतील विद्यार्थ्यांना 20 व शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना 10 रुपये शुल्क आकारले जाईल. प्राणीसंग्रहालयात लवकरच झेब्रा, माऊस डियर, सिंह, माकड, तसेच मर्मोसेट, टॅमरिन आणि जंगली कुत्रे आकारले जाईल. सर्पे उद्यानाचे पुनर्विकसनही सुरू आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored