Translate :

Sponsored

Purandar Airport News, 2026 : मोजणी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले, ड्रोनच्या माध्यमातून मोजणीचा प्रयत्न हाणून पाडला

मोजणी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनी परत पाठवले, ड्रोनच्या माध्यमातून मोजणीचा प्रयत्न हाणून पाडला

Purandar Airport News : गेल्या अनेक वर्षांपासून पुरंदर विमानतळाचा प्रकल्प चर्चेत आहे. शासनाने आता या प्रकल्पाला अधिकृत मान्यका दिलेली आहे. असे असताना आता येथील शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला असणारा विरोध दिसून येत आहे.

सासवड : 14-02-2026 

पुरंदर तालुक्यातून (Purandar Airport News)  एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुरंदर तालुक्यातील विमानतळ प्रकल्प बाधित गावात भूमी अभिलेख आणि महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या परस्पर ड्रोनच्या माध्यमातून मोजणी करण्याचा प्रयत्न केला होता. याची माहिती शेतकऱ्यांना मिळताच शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने जमून अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केल्याने मोजणी कऱण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना अक्षरशःपळ काढावा लागला आहे.

या भागात होणार आहे विमानतळ  (Purandar Airport News )

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी, कुंभारवळण या सात गावात विमानतळ प्रकल्प करण्यात येत असून, शासनाकडून 96 टक्के शेतकऱ्यांची संमती असल्याचे सांगितले जात आहे. याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळ प्रकल्पाचा आढावा घेतला होता. त्यानंतर लगेच दुसरी बैठक घेवून प्रकल्पाला लागणारा निधी सहा हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची तरतूद जाहीर केली आहे.

दरम्यान गेल्या दोन दिवसापासून शेतकऱ्यांना पुरंदरच्या प्रांतांकडून मोजणी झालेल्या शेतकऱ्यांना नोटीस देण्याची कार्यवाही सुरू केली असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झाला होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी शेतकऱ्यांना कोणतीही माहिती न देता भूसंपादन विभागाचे अधिकारी यांनी उदाचीवाडी आणि परगावच्या हद्दीत जाऊन ड्रोनच्या माध्यमातून मोजणी कऱण्यास सुरूवात केली. शेतकऱ्यांना याबाबत माहिती मिळताच शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने जमा होत संबंधित अधिकाऱ्यांना कडाडून विरोध केला. तसेच आम्हाला विश्वासात न घेता तसेच कोणती ही नोटीस न देता आमच्या जमिनीची परस्पर मोजणी का सुरू केली ? असा जाब विचारला.

अधिकाऱ्यांच्या गाडीला घातला घेराव  ( Purandar Airport News )

तसेच शेतकऱ्यांनी जमून अधिकाऱ्यांच्या गाडीली घेराव घातला. त्यामुळे त्यांना कामच करता आले नाही. त्यानंतर काही वेळाने पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत स्वतः त्या ठिकाणी जाऊन शासकीय जमिनीची मोजणी सुरू असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर शेतकऱ्यांनी जर शासकीय जमिनीची मोजणी केली असेल तर तशी कागदपत्रे दाखवा अशी मागणी केली. आम्हाला विमानतळाची आवश्यकता नाही. आमचा या विमानतळाला विरोध आहे. आमची सुजालाम सुफालाम जमीन तुम्ही भुरळ पाडून घेत आहेत. असा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored