Translate :

Sponsored

Purandar Airport Approval, Good News 2026 : Purandar Airport ला राज्य शासनाची मान्यता, 1 जून 2026 पर्यंत जमीन अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश : Maharashtra Government Purandar Airport Approval CM Fadanavis Announced

पुरंदर विमानतळाला राज्य शासनाची मान्यता.

Purandar Airport Approval : गेल्या काही वर्षांपासून पुणे जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या पुरंदर विमानतळाचा विषय चर्चेत आहे. मात्र आता अखेर या विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे. पुरंदर विमानतळामुळे लॉजिस्टीक्स, वेअरहाऊसिंग, एमएसएमई उद्योग, तसेच कृषी उत्पादनांच्या जलद वाहतुकीला गती मिळून शेतकऱ्यांनाही थेट बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. जाणून घेऊ या प्रकल्पाविषयी.

पुणे : 11-02-2026 

पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला (Purandar Airport Approval) राज्य शासनाने मान्यता दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतप केली. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण प्रक्रिया 1 जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

पुरंदर विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरण (स्पेशल पर्पज व्हेईकल) ची स्थापना करणे, प्रकल्पाला गती देण्यासाठी, भूसंपादन व अनुषांगिक बाबींसाठी सहा हजार कोटींचे कर्ज उभारणे, एमआयडीसी, एमएडीसी आणि सिडकी यांची सहभागीदारी तयार करणे, त्यांच्याकडील भागीदारीनुसार कर्ज फेडीची जबाबादारी सोपवणे तसेच या कर्जाला शासन मान्यता व हमी देण्यास मान्यता, अशा सर्वंकष प्रस्तावाला यावेळी मान्यता देण्यात आली.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ काय म्हणाले ?  (Purandar Airport Approval)

पुणे व पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय असल्याते सांगत पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. याबाबत मुरलीधर मोहोळ म्हणाले की, “वाढती एअर कनेक्टिव्हिटी ही उद्योग, व्यवसाय, आयटी क्षेत्र, पर्यटन क्षेत्र तसेच कृषी निर्यातीसाठी निर्णायक ठरणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी मोठा पर्याय उपलब्ध होणार असून, वाढत्या प्रवासी व मालवाहतूक क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने मध्य पूर्व, युरोप, दक्षिण-पूर्व आशिया आदी महत्त्वाच्या जागतिक मार्गांशी थेट हवाई संपर्क प्रस्थापित होण्यास मदत होईल, ज्यामुळे निर्यात, परकीय गुंतवणूक आणि जागतिक व्यवसाय संधींना नवी दालने खुली होणार आहेत.”

पुरंदर विमानतळामुळे लॉजिस्टीक्स, वेअरहाऊसिंग, एमएसएमई उद्योग, तसेच कृषी उत्पादनांच्या जलद वाहतुकीला दती मिळून शेतकऱ्यांनाही थेट बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा, विकास आणि गुंतवणूक वाढीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल, असा विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला. राज्य व केंद्र शासनाच्या समन्वयातून पुरंदर विमानतळ प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुरंदर विमानतळावर छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारणार  (Purandar Airport Approval)

पुरंदर विमानतळ परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून, यापूर्वी संपादित केलेल्या अतिरिक्त जमिनीवरील शिक्के काढण्यात येतील. या प्रकल्पात शेतकर्यांना भागधारक करण्यासंदर्भातही विचार केली जाईल. गावठाण पुनर्बांधणीसंदर्भातही योग्य निर्णय घेतला जाईल. प्रकल्पबाधितांना विशेष बाबा म्हणून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच बागायती झाडांच्या दरासंदर्भातही चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. तसेच राज्यातील सर्वच प्रकल्पबाधितांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची विचार सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored