Pune ZP School NASA Visit : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे व अंतराळातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा अभ्यास दौऱ्यामुळे झाला.
पुणे : 04/12/2025
पुणे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी 16 ते 27 नोव्हेंबर या बारा दिवसांत अमेरिकेतील नासाला (Pune ZP School NASA Visit ) भेट देत विज्ञान आणि शेतकरी कुटुंबातील 25 विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा अनोख्या अविष्कारासह विविध अभ्यास केंद्रातील तज्ञांशी संवाद साधला. जिल्हा परिषद पुणे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला असून महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी नासा संस्थेची भेट राबवणारी पुणे जिल्हा परिषद ही दुसरी उपक्रमशील जिल्हा परिषद ठरली आहे.
विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्या पुढाकारातून हा अभ्यास दौरा घेण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानत बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे व अंतराळातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा अभ्यास या दौऱ्यामुळे (Pune ZP School NASA Visit ) झाला. मुंबई-अबुधाबी-व्हाया वॉशिंग्टन असा प्रवास करत विद्यार्थ्यी अमेरिकेत दाखल झाले. यावेळी पुण्यातील आयुका संस्थेचे शास्रज्ञ समीर दुरडे विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते.
12 दिवसांत विविध अभ्यासकेंद्रांचा अनुभव (Pune ZP School NASA Visit )
दिनांक 16 ते 27 नोव्हेंबर या काळात विद्यार्थ्यांनी उद्धार हेझी एअर ॲंड स्पेस म्युझियम, इंडियन ॲम्बेसी, स्मिथ सोनियन नॅशनल एअर ॲंड स्पेस म्युझियम, गोल्डन गेट ब्रिज, लोम्बार्ड स्ट्रिट, कॅलिफोर्निया सायन्स सेंटर, डिज्निलॅंड केनेजी स्पेस सेंटर, एस्ट्रोनॉट ट्रेंनिंग सेंटर, कॉम्प्युटर हिस्टरी म्युझियम, टेक इटर ॲक्टिव म्युझियम, स्टॅन्ड फोर्ड युनिव्हर्सिटी या ठिकाणी भेट दिली. तसेच 27 नोव्हेंबरला बंगलोलर येथे आयुक्त व इस्रोच्या शास्रज्ञांची भेट घेतली.
विद्यार्थांचे झाले कौतुक (Pune ZP School NASA Visit )
वॉशिंग्टन डीसी येथे स्मिथ सोनियन नॅशनल एअर ॲंड स्पेस म्युझियमच्या भेटी दरम्यान भारतीय विद्यार्थ्यांनी दाखवलेली शिस्त, साधलेला संवाद पाहून स्थानिक शिक्षक व अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
This post was last modified on December 25, 2025 12:24 am