Translate :

Sponsored

Pune ZP-Panchayat Samiti Election Result, 2026 : मावळ पंचायत समितीवर कोणाचे वर्चस्व ? जाणून घ्या संपूर्ण निकाल : Pune Zilla Parishad And Panchayat Samiti Election Results 2026

पुण्यात मावळ पंचायत समितीवर कोणाचे वर्चस्व ? जाणून घ्या निकाल

Pune ZP-Panchayat Samiti Election Result : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवार गटाने 55 पैकी 39 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. खेड, आंबेगाव आणि इंदापुरमधील विजयी उमेदवारांची माहिती जाणून घेऊ.

पुणे : 09-02-2026 

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. एकुण 73 जागांपैकी 55 जागांचे निकाल हाती आले आहेत. यात राष्ट्रवादीने 39 जागांवर मुसंडी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या विजयामुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात अजित पवार यांची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

पक्षाची सध्याची स्थिती  (Pune ZP-Panchayat Samiti Election Result)

  • राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट ) 39
  • भाजप  – 08
  • शिवसेना (एकनाथ शिंदे गट ) 04
  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) 03
  • राष्ट्रवादी (शरद पवार गट ) 01
  • कॉंग्रेस व अपक्ष – 0

1 खेड तालुका (जिल्हा परिषद ) 

  • समीर सुपे ( राष्ट्रवादी – वाडा)
  • तनुजा घनवट (उबाठा)
  • दिप्ती भोगाडे (उबाठा-रेटवडी)
  • विजयसिंह शिंदे (उबाठा- पिंपळगाव)
  • गणेश अरगडे (उबाठा- मेदनकवाडी)
  • सुनीता बुटे (राष्ट्रवादी-पाईट)
  • गणेश बोत्रे (राष्ट्रवादी-नाणेकरवाडी)
  • विनया मुंगसे (उबाठा-कुरळी)

2 आंबोगाव तालुका 

  • विवेक वळसे पाटील (राष्ट्रवादी -पारगाव )
  • विष्णू काका हिंगे (राष्ट्रवादी-अवसारी बु.)
  • शीला राजेंद्र लोहोकरे (राष्ट्रवादी-शिनोली)
  • प्रीती प्रवीण थोरात (राष्ट्रवादी SP -कळंब)
  • सुवर्णा देविदास दरेकर (शिवसेना शिंदे गट – घोडेगाव)

3. दौंड आणि भोर 

  • तुषार रमेश थोरात (राष्ट्रवादी- भोलावडे गण)
  • प्रवीण जगदाळे (राष्ट्रवादी-भोलावडे-शिंदे गट)

4 इंदापूर आणि मावळ 

  • यशराज जगदाळे (राष्ट्रवादी-वडापुरी-माळवाडी) मोठ्या मताधिक्याने विजयी
  • दिपाली गव्हाणे (राष्ट्रवादी SP -रांजणगाव सांडस तळेगाव) आमदार बापू पठारे यांच्या कन्या विजयी
  • विद्या भुजबळ (भाजप-तळेगाव गण) विजयी

पुण्यातील मावळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी अजित पवरा गटाचे वर्चस्व  (Pune ZP-Panchayat Samiti Election Result)

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसोबतच पंचायत समित्यांचे निकालही अत्यंत चुरशीचे ठरले आहे. यात विविध तालुक्यांमध्ये संमिश्र चित्र पहायला मिळत असले तरी, मावळ तालुक्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. खेड पंचायत समितीत शिवसेना ठाकरे गटाने 12 जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला येथे केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे. मावळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपली 20 वर्षांपासूनची सत्ता पुन्हा एकदा राखरी आहे. इंदापुरमध्ये वडापुरी आणि माळवाडी गणातून यशराज जगदाळे, अर्चना खबाले आणि कल्पना पाटील या राष्ट्रवादीचे राजेश बोडके विजयी झाले असून, एकंदरीत ग्रामीण भागातील स्थानिक गणांमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार  गट ) आणि महायुतीचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored