Translate :

Sponsored

Pune University Job, Good news 2025 : पुण्यात काम शोधताय ? विद्यापीठातच भरती सुरू, जाणून घ्या निकष आणि अंतिम तारीख

पुणे विद्यापीठात नोकरीच्या संधी.

Pune University Job : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अधिष्ठाता आणि परिक्षा संचालक पदांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर ही आहे. जाणून घ्या याविषयीची अधिक माहिती.

पुणे : 11/11/2025

पुण्यामध्ये नोकरीच्या संधीची वाट पहात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही भरती फार महत्त्वाची मानली जात आहे.मात्र यासाठी फक्त 5 पदांसाठी आहे.

सावित्रीबाई फुले विद्यापीठात या भर्तीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिष्ठाता आणि परिक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. 13 नोव्हेंबरपासून उमेदवारांना अर्ज करायचे असून 12 डिसेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. दिलेल्या मुदतीच्या अंतर्गत उमेदवारांना सगळे नियम पाळून अर्ज करता येणार आहे. अधिष्ठाता पदासाठी 4 जागा (मानव्यविज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान व तंत्रज्ञान, आंतरविद्याशाखीय अभ्यास) रिक्त आहेत. तर रीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक पदासाठी फक्त 1 जागा शिल्लक आहे.

आरक्षणावरून पदांचे वाटप  (Pune University Job)

पदांचे वाटप हे आरक्षणावरून करण्यात येणार आहे. ओबीसी पदासाठी 1 जागा रिक्त आहे. एससी पदासाठी जागा, विमुक्त जाती (अ) पदासाठी 1 जागा रिक्त तर अराखीव पदासाठी 1 जागा रिक्त आहे. ही भरती उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या नव्या नियमांनुसार निवड प्रक्रिया होणार. एकुण 100 गुणांची परीक्षा घेण्यात येणार असून शैक्षणिक पात्रतेमध्ये किमान 50 गुण निश्चित करण्यात आले आहे तर मुलाखतीमध्ये 50 गुण. 100 गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना भरतीमध्ये नियुक्त करण्यात येणार आहे. सध्या अधिष्ठात्यांची कामे प्रभारी पदांवरून चालवली जात आहेत. भरती प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न. जाहिरात आणि अर्जाची लिंक विद्यापीठाची अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored