Pune Porsche Case 2024 : महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेल्या पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने तीन आरोपींना जामीन मंजूर केला, ज्यामध्ये दोन उच्चशिक्षित तरूणांचा मृत्यू झाला होता.
पुणे : 02-02-2026
पुणे पोर्श कार (Pune Porsche Case 2024) अपघातात 2024 मध्ये दोन आयटी व्यावसायिकांचा मृत्यू झाला होता. या 2024 च्या पुणे पोर्श हिट-अँड-रन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. रक्ताच्या नमुन्यांशी छेडछाड कोल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर करण्यात आलेल्यांपैकी आदित्या अविनाश सूद, आशिष सतीश मित्तल आणि अमर संतोष गायकवाड यांचा समावेश आहे. अपघातात सहभागी असलेल्या अल्पवयीन आरोपींना वाचवण्यासाठी पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप या तिघांवर होता.
23 जानेवारी रोजी, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी अमर सतीश गायकवाड यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितले होते. गायकवाडवर मध्यस्थ म्हणून काम करण्याचा आणि अल्पवयिन आरोपीच्या रक्ताचा नमुना बदलण्यासाठी रूग्णालयातील डॉक्टरांच्या सहाय्याला 3 लाख रुपये देण्याचा आरोप आहे. 19 मे 2024 रोजी, 17 वर्षीय मुलाने चालवलेल्या पोर्श कारने पुण्यातील कल्याणी नगर भागात दोन आयटी व्यावसायिकांनी धडक दिली आहे आणि त्यांचा मृत्यू झाला. 7 जानेवारी रोजी, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील इतर दोन आरोपींना जामीन मिळवण्यासाठी दाखल केलेल्या याचिकांवर महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितले.
या प्रकरणातील माहितीनुसार, 19 मे 2024 रोजी पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एका पोर्श कारने (Pune Porsche Case 2024) दोघांना धडक दिली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी दारू पिऊन असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने कार चालवल्याचे तपासात समोर आले. सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, ड्रग्ज व्यसन ही वेगळी बाब आहे, परंतु मुलांना आनंदात सहभागी होण्यासाठी कारच्या चाव्या आणि रोख रक्कम देणे पूर्णपणे अस्वीकार्य आहे.”
कोण आहेत जामीन मिळालेले आरोपी ? (Pune Porsche Case 2024)
अमर संतोष गायकवाड – अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात बदल करण्यासाठी त्याने डॉक्टरांच्या सहाय्यकाला 3 लाख रूपये दिल्याचा आरोप आहे.
आदित्य अविनाथ सूद आणि आशिष सतीश मित्तल – त्यांच्या रक्ताचे नमुने तपासात वापरले गेले, जरी ते कारमध्ये उपस्थित असलेल्या दोन अल्पवयीन मुलांशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले.
यापूर्वी, डिसेंबर 2024 मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने अमर गायकवाडसह आठ आरोपींच्या जमीन अर्ज फेटाळल्या. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितले आणि आता तिघांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याबद्दल या प्रकऱणात एकुण 10 जणांना तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली, ज्यात अल्पवयीन मुलाचे पालक विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल, डॉक्टर अजय तावले आणि श्रीहरी हालनोर, ससून रूग्णालयाचे कर्मचारी अतुल घाटकांबळे आणि दोन मध्यस्थ यांचा समावेश आहे.
पोर्श कार अपघात प्रकरण (Pune Porsche Case 2024)
18-19 मे 2024 च्या रात्री, पुणे शहरात एका 17 वर्षीय मुलाने सुमारे 3 कोटी रुपयांची पोर्श कार वेगाने चालवत असताना एका मोटार सायकलला धडक दिली. वाहनाची धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचा तोल गेला आणि तो बराच अंतर रस्त्यावर ओढला गेला, ज्यामुळे त्यावरील दोघे जागीच ठार झाले. घटनेच्या 14 तासांनंतर, आरोपी अल्पवयीन मुलाला न्यायालयाने काही अटींसह जामीन मंजूर केला. न्यायालयाने त्याला 15 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याचे आणि रस्ते अपघातांचे परिणाम आणि उपाय यावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्याचे निर्देश दिले. वाद वाढताच, न्यायालयाने त्याचा जामीन रद्द केला. यानंतर, पुणे पोलिसांच्या विनंतीवरून, जेजेबीने आदेश बदलला आणि अल्पवयीन मुलाला निरीक्षण गृहात पाठवले. तथापि, जून 2024 मध्ये, उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलाला सोडण्याचे आदेश दिले.
2024 मध्ये पुण्यात झालेल्या (Pune Porsche Case 2024) पोर्श कार अपघातातील तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (2 फेब्रुवारी) जामीन मंजूर केला. अल्पवयीन मुलांशी संबंधित अशा घटनांसाठी पालक जबाबदार असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की पालक त्यांच्या मुलांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. खंडपीठाने म्हटले आहे की, ” ड्रग्जचे सेवन ही वेगळी बाब आहे. परंतु त्यांना मजा करण्यासाठी कारच्या चाव्या आणि पैसे देणे अस्वीकार्य आहे.”