Translate :

Sponsored

Pune Porsche Accident Case 19 May 2024: पुण्यातील पोर्शे कार अपघाताला एक वर्ष पूर्ण; मृतांचे नातेवाईक आजही न्यायाच्या प्रतिक्षेत

पुणे : 2025-05-19

पुणे पोर्शे कार अपघाताला  (Pune Porsche Accident Case ) आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. एक वर्षांनंतरही मृतांचे नातेवाईक न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. न्यायप्रक्रियेवरच यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 

पुणे : एक वर्षापूर्वी पुण्यात पोर्शे कारचा अपघात झाला होता. भरधाव वेगाने जाणाऱ्या  एका बांधकमा व्यावसायिकाच्या नशेतील अल्पवयीन मुलाच्या कारने दुचाकीला धडक मारली होती. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे (Pune Porsche Accident Case ) देशभरातून संतापाची लाट उसळली होती. 

ही कार चालवणारा धनाढ्य पित्याचा मुलगा अल्पवयीन होता, आणि दारू पिऊन गाडी चालवत होता. हे तपासाता निष्पन्न होऊन, त्या मुलाला वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेल्यामुळे, या केसने देशभरातील जनतेचे लक्ष्य वेधून घेतले होते. 

या दुर्दैवी घटनेला एक वर्ष उलटून गेले आहे, तरीही मृत अनीश अवधिया आणि त्याची मैत्री अश्विनी कोस्टा यांचे कुटुंबिय  अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.  या घटनेनंतर आरोपाला वाचवण्याचा बराच प्रयत्न करूनही शेवटी अल्पवयीन मुलाचे वडील, दोन डॉक्टर आणि इतर काहीजण जेलमध्ये आहेत. मुलाच्या आईला सध्या अंतरिम जामिन मिळाला आहे. 

आज झाले एक वर्ष पूर्ण –

पुण्याच्या कल्याणी नगर भागात 19 मे 2024 ला नशेमध्ये गाडी चालवणाऱ्या पोर्शे गाडीने एका दुचाकीला धडक मारली होती. दुचाकीवरील अवधिया आणि कोस्टा यांचा या धडकेत मृत्यू झाला होता. घटनेच्या काही वेळातच आरोपीला ताब्यात घेतले होते.मात्र काही तासातच किशोर न्याय बोर्ड ( जेजेबी) चे सदस्य एल.एन.दानवडे यांनी त्याला जामीन मंजूर केला. या केसमधील सर्वात संतापजनक घटना होती, ती अल्पवयीन आरोपीला 300 शब्दांचा रस्ता सुरक्षेविषयक निबंध लिहिण्याची शिक्षा देऊन, जामिनावर सोडण्यात आले होते. मात्र लोकांच्या संतापाचा आणि विरोध लक्षात घेऊन, जामीन देण्याच्या निर्णयावर पुर्नविचार करून, अल्पवयिन आरोपीला सुधारगृहात पाठवण्यात आले. त्यानंतर त्याला मुंबई उच्च न्यायालयाने सोडून देण्याचे आदेश दिले. 

यासगळ्या घटनाक्रमात मृतांचे कुटुंबिय मात्र न्याय मिळण्यासाठी होत असणाऱ्या विलंबामुळे निराश झाले आहेत. अनिश अवधियाचे वडील ओम अवधिया यांनी म्हटले आहे की, एक वर्ष होऊनही अजून केस सुरूच आहे. कोर्ट केस ताणली जात आहे. आमचा मुलगा तर आमच्या सोबत नाही,पण आम्हाला न्याय मिळाला तर, जे लोकं पैसा आणि ताकद कायद्यापेक्षा मोठी आहे समजतात, आणि रस्त्यावर भरदाव वेगात, नशेत  गाडी चालवतात त्यांना यातून संदेश दिला जाईल. 

विशेष सरकारी वकिल शिशिर हिरे म्हणाले की, सत्र न्यायालयाने तुरुंगात असलेल्या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. खटला जलदगतीने चालावा यासाठी आम्ही आरोप निश्चित करण्यासाठी अर्ज आधीच दाखल केला आहे. मात्र या प्रकरणात अटक झालेल्या एका डॉक्टरने सुटकेसाठी न्यायालयात धाव घेतल्याने कार्यवाहीला विलंब होत आहे. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored