Translate :

Sponsored

Pune Parth pawar Land Scam , Important News : पार्थ पवार यांच्या मामे भावाला अटक होणार का ? पुण्यातील जागेचं प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग : pune crime Pune Land case Transferred To Crime Branch

पुणे जमीन घोटाळा प्रकरणात दिग्विजय पाटील यांना अटक होणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.

Pune Parth pawar Land Scam : पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सरकारी जमीन अवैधरित्या खाजगी कंपनीच्या नावाने केल्याचा आरोप असून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला आहे.

पुणे : 11/11/2025

पुण्यातील बहुचर्चित असणाऱ्या मुंढवा जमीन व्यवहार प्रकऱणात (Pune Parth pawar Land Scam) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांकडून केला जात आहे. सरकारी जमीन ही एक रूपया न भरता खाजगी कंपनीच्या नावाने करण्यात आली आहे. हा सगळा प्रकार बाहेर आल्यावर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप करण्यात आले. पार्थ पवार यांच्या कंपनीने हा व्यवहार केला आहे असं सांगण्यात आले आणि 1800 कोटी रूपये बाजार भाव असलेली जमीन ही 300 कोटी रूपयांना विकण्यात आली. मात्र या सगल्या प्रकरणात दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.

कोणा कोणाची चौकशी होणार ? (Pune Parth pawar Land Scam)

आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग झाल्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने महसूल विभागाला पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी व्यवहार कसा झाला याची माहिती मागितली आहे. हा व्यवहार कसा झाला याची कागदपत्र आल्यावर चोकशीसाठी पुणे पोलीस नोटीस देणार आहेत. सुरूवातीला पोलीस तपासणार आहेत या मध्ये कोण कोण सहभागी आहे ? दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता पुणे पोलीस चौकशीसाठी नोटीस देणार आहेत.

पार्थ पवार यांच्या मामेभाऊ दिग्विजय पाटीलला अटक होणार का ? (Pune Parth pawar Land Scam)

अमेडिया कंपनीचा संचालक दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुणे पोलिसांची पथक त्याचा शोध घेत आहेत. त्या जमिनीचा व्यवहार जरी रद्द झालेला असला तरी सही करण्यासाठी त्यांना मुद्रांक शुल्क कार्यालयात हजर रहावं लागणार आहे. या चौकशीसाठी त्यांना नोटीस दिली जाते की बोलवलं जात हे पहावे लागेल. मात्र शीतल तेजवानी ही परदेशात गेल्यातं बोललं जात आहे. जी या प्रकऱणात पॉवर ऑफ ॲटर्नी होती. या दोघांवर तर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांचा आथा शोध जातो की ते स्वतः हजर राहतात हे कळेल. मात्र आता हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. याचा तपासात आता आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored