Translate :

Sponsored

Pune Metro Line 3 च्या मेट्रो ट्रेन आता नारी शक्तीकडे, सर्व ट्रेन महिला चालक चालवणार ! : Great News , Pune Metro Line 3 Will Be Operated By Women Pilot

Pune Metro Line 3

Great News ,Pune Metro Line 3 :पुण्यातील Pune Metro Line 3 जी हिंजवडी ते शिवाजीनगरला जोडणारी जी मेट्रो ट्रेन आहे त्यात आता मोठा बदल करण्यात येत आहे. या सर्व ट्रेन आता महिला पायलटच्या हातात असणार आहेत.

पुणे : 23/09/2025

पुण्यातील मेट्रो लाईन 3,(Pune Metro Line 3) जी ट्रेन हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर धावते, या ट्रेनच्या व्यवस्थापनात मोठा बदल होणार आहे. या मार्गावर चालवण्यात येणाऱ्या सर्व ट्रेन आता महिला चालकांच्या हाती असणार आहेत.

पुणे मेट्रोने हा निर्णय घेऊन एक प्रकारे नारी शक्तीलाच सशक्त करणारा आहे. समाजासमोर हे एक मोठे उदाहरण ठरणारे आहे. नवरात्रीच्या दिवसात घेण्यात आलेला हा निर्णय महामेट्रोच्या व्यवस्थापनातील खास निर्णय म्हणता येईल. नवरात्रीच्या दिवसात महिलांच्या हातात या ट्रेन चालवण्यासाठी देऊन हे खास ठरले आहे.

चार ट्रायल यशस्वी (Pune Metro Line 3)

या महिला पायलटकडून मान डेपो (स्टेशन नंबर 1 ) ते बालेवाडी स्टेडियम (स्टेशन नंबर 10 ) या दरम्यानच्या चार ट्रेन ट्रायल पूर्ण केल्या गेल्या आहेत.हिंडवडीच्या आयटी हबला शिवाजीनगर सारख्या मध्यवर्ती भागाला जोडणाऱ्या मेट्रो ट्रेनचा फायदा सुमारे 3 लाख प्रवाश्यांना मिळणार आहे.

तीन महिन्यांचे विशेष प्रशिक्षण (Pune Metro Line 3)

या महिला चालकांना तीन महिन्यांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. यातील 200 किलोमीटर पर्यंतचे क्षेत्र ज्यात दिवस-रात्र मेट्रो ट्रेन चालवण्याच्या प्रशिक्षणाचा अंतर्भाव आहे. मेट्रे ट्रेन चालवण्याच्या प्रशिक्षणासह त्यांची सुरक्षा, आरोग्य आणि स्वतःची नोकरी जास्त काळापर्यंत टिकवून ठेवण्यासाठी लागणाऱ्या कौशल्याचा अंतर्भाव आहे. या सर्व प्रशिक्षणा दरम्यान या सर्व महिला चालकांनी आपली योग्यता सिद्ध केली आहे.

100 महिलांना देण्यात आली मेट्रो चालवण्याची  जबाबदारी (Pune Metro Line 3)

पुणे आईटी सिटी मेट्रो रेल्वे लिमिटेड (PITCMRL) या कंपनीने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. फ्रेंच आंतरराष्ट्रीय कंपनी ‘केओलिस’ ला 10 वर्षांसाठी याचे कॉंट्रॅक्ट देण्यात आले आहे. या अंतर्गत 100 महिलांना मेट्रो चालवण्याचे ट्रेनिंग देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात महिलांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored