Pune Metro Route News : पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या प्रकल्पामुळे टाटा प्रोजेक्टस लिमिटेड कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. काय आहे हे प्रकरण आपण जाणून घेऊ.
पुणे : 23/09/2025
पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग निर्मितीच्या प्रकल्पासंदर्भात आता काही वाद निर्माण झाले आहेत. या प्रकल्पाच्या (Pune Metro news) कामकाजा संदर्भात काही गंभिर आरोप लावण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी काम करणाऱ्या टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीने बालेवाडी येथील महामार्गावर मोकळ्या जागेत खोदकाम केलेला अतिरिक्त मातीचा ढिगारा, कचरा टाकला आहे.
या प्रकरणाची चौकशी करताना, पुणे महानगरपालिका आयुक्त (पीएमसी) नवल किशोर राम यांनी याठिकाणी हाईवा डंपरो (MH12XN130 आणि MH 12XM 8049 ) मधून राडारोडा बाहेर टाकताना पाहिले आहे. सुमारे 50-70 ट्रक इतका कचरा या ट्रकमधून टाकल्याते निष्पन्न झाले आहे. मे 2024 मध्ये काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार यासाठी आता 15 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. या परिपत्रकानुसार दोन दिवसात दंडाची ही रक्कम कंपनीने भरून हा कचराही येथून हटवण्यात यावा असा आदेश देण्यात आला आहे. नाहीतर कंपनीवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
टाटा कंपनीचे स्पष्टीकरण (Pune Metro news – Hinjawadi-Shivajinagar metro Route)
टाटा प्रोजेक्टस कडून असे सांगण्यात आले आहे की, आम्ही उर्वरित कचरा हा अधिकृत ठिकाणीच टाकला आहे. जिथे हा अवैध ठिकाणी कचरा टाकलेला निर्दशनास आला आहे, तो अज्ञात माणसांकडून टाकण्यात आला आहे. या संदर्भात एक व्हिडियोसुद्धा समोर आला आहे. ज्यात हे ट्रक पुणे महानगर पालिकेचे असल्याचे दिसत आहे. मेट्रो प्रशासनाकडूनही नियम पाळले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
मेट्रो मार्गात 23 स्टेशनची निर्मिती (Pune Metro news – Hinjawadi-Shivajinagar metro Route)
हिंजवडी ते शिवाजीनगर हा एकुण 23.33 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आहे. या मार्गात 23 स्टेशनची निर्मिती केली जाणार आहे. हा सर्व. प्रकल्प खाजगी भागिदारी मॉडेलवर केला जात आहे. यात टाटा समूहाची टीआरआईएल अर्बन ट्रांसपोर्ट प्रा.लि. आणि सीमेंस प्रोजेक्ट वेंटर्स जीएमबीएच यांचा सहभाग आहे. या सर्व प्रकल्पाची जबाबदारी पुणे आईटी सिटी मेट्रो रेल्वे लिमिटेड कंपनीकडे पुढील 35 वर्षांसाठी देण्यात आली आहे.