Translate :

Sponsored

Pune Metro News, Good News, 2025: पुणेकरांचा प्रवास होणार सुरळीत, क्रेंद्र सरकारची 10 हजार कोटींची भेट, आणखी दोन मार्गांना मंजूरी : Modi Government Aprrove Pune Metro Routs

पुणेकरांचा प्रवास होणार सुरळीत, क्रेंद्र सरकारची 10 हजार कोटींची भेट, आणखी दोन मार्गांना मंजूरी

Pune Metro News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारने मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता.

पुणे : 27/11/2025

पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पुणे मेट्रोच्या (Pune Metro News) 31.6 किलोमीटर अंतराच्या दोन विस्तारित मार्गिकांना मान्यता दिली आहे. त्यामुळे पुणे मेट्रो शहराच्या चारही बाजूला विस्तारणार असून पुण्याची सार्वजनिक वाहतूक अधिक सुरूक्षित, आरामदायी आणि वेगवान होणार आहे.

शहरातील मेट्रो मार्गाच्या विस्तारणासाठी खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री देवंद्र फडणीवस यांच्या सार्वजनिक राज्य सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. मेट्रो मार्गांच्या मंजुरीसाठी मोहोळ यांनी नगरविकास मंत्री मनोहर लाल खट्टर यांची नुकतीच भेट घेतली होती.

बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात मार्गिका क्रमांक- 4 खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला व मार्गिका क्रमांक 4 नळस्टॉप -वारजे-माणिकबाग या दोन मार्गिकांचा समावेश आहे. या दोन्ही मार्गिकांसाठी हडपसर हे इंटरचेंज स्थानक असतील. या दोन्ही उन्नत (एलिव्हेटेड) मार्गिकांटी एकत्रित लांबी 31.60 किलोमीटर असून त्यावर एकूण 28 स्थानके असतील. यासाठी 9857 कोटी 85 लाख रूपये खर्च अपेक्षित असून हे काम पाच वर्षात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे.

मुरलीधर मोहोळ काय म्हणाले ? (Pune Metro News)

पुण्यासाठी खराडी-खडकवासला (मार्गिका 4) आणि नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग (मार्गिका 4 ) मार्गांनी मोदी सरकारची मंजुरी. पुणे मेट्रो रेल्वे नेटवर्कच्या फेज-2 अंतर्गत लाईन 4 (खडकी-खडकवासला) आणि लाईन 4 अ (नळस्टॉप-वारजे-माणिक बाग) या दोन्ही मार्गांनी मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पामध्ये रुपये 9,857.85 कोटींची तरतूद असून, पुढील 5 वर्षात हे काम पूर्ण होणार आहे.

या मार्गांनी मंजुरी मिळावी यासाठी नुकतीच केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. या विस्तारामुळे 31.6 किमीचे नवे नेटवर्क, 28 एलिव्हेटेड स्टेशन तयार होतील ज्यामुळे IT हब, व्यावसायिक खडकी, नळस्टॉप, वारजे, माणिकबाग आणि डेक्कन-स्वारगेट परिसराला प्रंचड फायदा होणार असून पुणेकरांसाठी ही खरोखरच मोठी आनंदाची बातमी आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored