Translate :

Sponsored

Pune Metro Expansion, Good News 2026 : पुणे मेट्रोचे 200 किमीचे जाळे उभारण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश : Pune Metro Expansion Cm Devendra Fadnavis Plans 200 Km Network For Pmc Pcmc Pmrda

पुणे मेट्रोचे 200 किमीचे जाळे उभारण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश .

Pune Metro Expansion : मेट्रो स्थानकाचे आधुनिक डिझाईन, मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी, प्रवासी सुविधा तसेच अत्याधुनिक तांत्रिक प्रणाली या सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे.

पुणे : 16-03-2026 

पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्राचा (Pune Metro Expansion) समावेश असलेले जवळपास 200 किलोमीटरचे मेट्रो जाळे उभारण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वेगाने विकसित होणाऱ्या नागरी विकासाचा विचार करून पुणे मेट्रो आणि नगर विकास विभागाने या संपूर्ण नेटवर्कचे सविस्तर नियोजन तातडीने करण्याते निर्देश त्यांनी दिले. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीदेखील फडणवीस यांनी दिली. ‘मेट्रो भवन’चे उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुण्यात पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुर, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळक, भीमराव तपकीर, सुनील कांबळे, हेमंत रासने, बापू पठारे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ते, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच महामेट्रोचे व्यवस्थापकिय संचालक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.

देशातील सर्वाधिक वेगाने पुर्ण झालेला प्रकल्प (Pune Metro Expansion)

मेट्रो फडणवीस म्हणाले, पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरूवातीला काही अडचणींमुळे उशिरा सुरू झाले असले तरी एकदा गती मिळाल्यानंतर अत्यंत वेगाने हा प्रकल्प पूर्ण कऱण्यात आला. देशातील सर्वाधिक गतिमानतेने पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांमध्ये पुणे मेट्रोचा उल्लेख केला जातो. मेट्रो स्थानकांचे आधुनिक डिझाइन, मल्टीमॉडेल कनेक्टिव्हिटी, प्रवासी सुविधा अत्याधुनिक तांत्रिक प्रणाली  या सर्व बाबीमध्ये उत्कृष्ट नियोजन कऱण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, पुणे मेट्रो भवन केवळ प्रशासकीय मुख्यालय नसून आधूनिक पुण्याच्या प्रगतीचे प्रतीक आहे. आत्याधुनिक अभियांत्रिकी आणि सुयोग्य नियोजनाचा उत्कृष्ट नमुना असलेली ही इमारत पुण्याच्या प्रशासकीय वैभवात महत्त्वाची भर घालणारी ठरेल. पुणे-मेट्रोसाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या कामाचेही त्यांनी स्मरण केले.

सध्या पुणे शहरात सुमारे 33 किलोमीटरचा मेट्रो मार्ग कार्यान्वित झाला आहे. टाटा समूहाच्या सहकार्याने देशातील पहिल्या सार्वजनिक -खाजगी भागीदारी (पीपीपी) असलेल्या 23 किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाचे कामही अंतिम टप्प्यात असून त्यापैकी 12 किलोमीटर मार्गाचे उद्धाटन मे महिन्यात, तर उर्वरित 11 किलोमीटर मार्ग जुलै महिन्यात सुरू कऱण्याचे नियोजन आहे.

33 किमी मेट्रो मार्ग अंतिम टप्प्यात (Pune Metro Expansion)

सध्या 56 किमींचे जाळे आणखी 80 किमी विस्तार पुण्यातील मेट्रोचे एकूण जाळे सुमारे 56 किलोमीटरपर्यंत पोहोचणारे आहे. याशिवाय आणखी 55 किलोमीटरचे काम सुरू असून सुमारे 80 किलोमीटरच्या विस्तार प्रस्तावित आहे. भविष्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्राचा समावेश असलेले जवळपास 200 किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क उभारण्याचे नियोजन आहे.

स्वारगेट-कात्रज, पिंपरी-चिंचवड-भक्तीशक्त चौक, वनाज-चांदणी चौक, रामवाडी-वाघोली, खडकवासला खराडी, वारज-नळस्टॉप तसेच हडपसर-सासवड आणि हडपसर-लोणी काळभोर या महत्त्वाच्या मेट्रो मार्गांना गती देण्यात आली आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored