Translate :

Sponsored

Pune Gang Rape, Shocking News, 2026 : पुण्यात 9 वर्षीय बालिकेवर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न, पुन्हा एकदा महाराष्ट्र हदरले ! : Pune Gang Rape Attempet On 9 Year Old Girl Police started Investigation

पुण्यात 9 वर्षीय बालिकेवर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न, पुन्हा एकदा महाराष्ट्र हदरले !

 Pune Gang Rape : नसरापुर बालिका अत्याचाराच्या घटनेनंतर पुणे परत एकदा हदरले आहे. पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार आला आहे. येथे एका 9 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

पुणे : 05-05-2026

पुण्यात नक्की काय सुरू आहे ? असा प्रश्न पडावा इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मुलींच्या सुरक्षेचा (Pune Gang Rape) प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात एका 60 वर्षीय व्यक्तीने चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या केली. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोप भीमराव कांबळे याला कठोरातील कठोप शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे आरोपीच्या कुटुंबियांनीही त्याला कठोर शासन करावे, अशी भावना व्यकत् केली आहे. ही घटना ताजी असतानाच आता पुणे जिल्ह्यातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील पर्वती येथे एका 9 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेने आता संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.

घटना काय आहे ? Pune Gang Rape

पुण्यातील पर्वती या भागात ही घटना घडली आहे. येथे 9 वर्षीय मुलीवर काही लोकांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु संशय आल्याने त्या भागातील लोकांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे अनर्थ टळला. हा प्रकार समोर आल्यानंतर तेथील नागरिक चांगलेच संतप्त झालेले पहायला मिळाले. घटना समोर येताच लोकांनी तेथे गर्दी केली. पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. परंतु संतत्प नागरिक आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत होते. तेथे मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता.

पोलिसांनीही तत्परता दाखवत संशयित आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पोलीस तपास करत. ही घटना समोर आल्यानंतर आता पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दुसरीकडे नसरापूरच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असताना दुसरीकडे हा प्रकार समोर आल्याने पुण्यात नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित केला जातो.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored