पुण्यातील अजितदादा गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे( Vaishnavi Hagwane) हिने आत्महत्या केली. या आत्महत्येच्या मागील कारणं, आणि तिचा झालेला छळ याबाबातील्या अनेक गोष्टी समोर येत आहेत.
pune Crime News : 2025-05-21
पुण्यातील अजितदादा गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे ( Vaishnavi Hagwane) (वय 23 ) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुळशी तालुक्यातील भुकूम येथे शुक्रवारी ( दि.16 मे ) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक, शारिरिक ठळ करून क्रूर वागणूक दिल्याने वैष्णवी यांनी आत्महत्या केल्याची तक्रार पोलींसांत करण्यात आली आहे.
ही घटना घडून चार पाच दिवस उलटून गेले आहेत, त्यानंतर वैष्णवीच्या आई-वडिलांचा आक्रोश बघवत नाही. हळूहळू वैष्णवीच्या छळाच्या, अपमानाच्या आणि सासरच्या लोकांना पैशाची किती हाव होती याच्या अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. वैष्णवी हगवणे हिच्या सासरच्यांनी तिचा मानसिक आणि शारिरिक छळ चालवला होता. लग्नाला दोन वर्ष झाले होते. मात्र लग्नाच्या पाच- सहा महिन्यातच तिच्या ( Vaishnavi Hagwane) छळाला सुरूवात झाली होती.
पुण्यातील एका प्रथितयश राजकिय कुटुंबाकडून पैशासाठी सूनेचा असा छळ होणं हे समाजासाठी फारच धक्कादायक आहे. वैष्णवीचे वडील आणि संपूर्ण कस्पटे कुटुंबियांनी वैष्णवीच्या छळाची संपूर्ण कहानी सांगितली आहे.
लग्नानंतर वैष्णवी ( Vaishnavi Hagwane) जेव्हा जेव्हा घरी येत असे, तेव्हा ती पैशांची मागणी करत असे. लग्नातनंतरच्या प्रत्येक सणवाराला कस्पटे कुटुंबियांकडून महागडे गिफ्टस, चांदीची ताटं, चांदीच्या गौरीचे मुखवटे असं बरच काही देऊनही वैष्णवीचा छळ सूरूच होता. लग्नात वैष्णवीला 51 तोळे सोनं , जावयाला फॉर्च्युन गाडी, दिड लाखाचा मोबाईल , अधिक महिन्यात दिड तोळ्याची अंगठी, असं बरंच कस्पटे कुटुंबियांकडून सुरू होतं.
वैष्णवीच्या सासू आणि नणंदेने तिला मध्यंतरी बरीच मारहान केली होती. तिच्या अंगावर थुंकलं गेलं, असे अमानुष प्रकारही तिच्या बाबतीत होत होते. हे सगळं बघून वैष्णवीच्या वडीलांनी तिची सासू , नणंद आणि जावई यांचे पायही धरले होते. मुलीचा संसार वाचवण्यासाठी आम्ही खुप प्रयत्न केले, मात्र शेवटी छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली असे म्हणत ते मुलीच्या मृत्यूचा पश्चाताप करत आहेत.
याआधीही एकदा केला होता आत्महत्येचा प्रयत्न
वैष्णवी हगवणेच्या ( Vaishnavi Hagwane) आत्महत्येनंतर करण्यात आलेल्या पोलीस एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी ऑगस्ट 2023 मध्ये गरोदर होती, तेव्हा हे बाळ माझे नाही म्हणून संशय व्यक्त करून शशांक हगवणे याच्याकडून तिला मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली होती. तिला घरातून हाकलूनही देण्यात आले होते. तेव्हा तिने 27 नोव्हेंबर 2023 ला पहिला आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी त्वरीत दवाख्यानात नेल्याने तिचा जीव वाचला होता.
शवविच्छेदनाचा अहवाल
वैष्णवीचे शवविच्छेदन पुण्यातील प्रसिद्ध ससून रूग्णालयात वैष्णवीचे ( Vaishnavi Hagwane) शवविच्छेदन करण्यात आले आहे. डॉ. जयदेव ठाकरे आणि डॉ. ताटिया यांच्या अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र तिच्या अंगावर मारहाणीच्या, रक्त साकाळल्याच्या खुणा असल्याने तिने आत्महत्या केली नसून, तिचा खुण केला गेला असल्याचा संशय तिच्या नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यादिशेने तपास व्हावा अशी मागणी कस्पटे कुटुंबियांकडून केली जात आहे.