Translate :

Sponsored

महिला पोलीस अधिकाऱ्याच्या विनयभंगाचा आरोप; भाजप पदाधिकाऱ्याचा राजीनामा : Pune BJP Leader Pramod Kondhare Resign After Allegedly Misbehaved With Police Officer

Pramod Kondhare : पुण्यातील एका भाजप पदाधिकाऱ्यावर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. तिने या प्रकाराची वरिष्ठांकडे तक्रार केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्यावेळी हा सर्व प्रकार घडला. 

पुणे : 25/06/2025

महिला पोलिस अधिकाऱ्याच्या विनयभंगाचा आरोप असलेल्या भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरे याने राजीनामा पाठवला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्यावेळी हा सर्व प्रकार घडला. एका महिला पोलीस निरिक्षकाने प्रमोद कोंढरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. सोमवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नितीन गडकरी पुण्यात येणार होते. भाजपचे नेते शनिवार वाड्याजवळ जमले होते. त्यावेळी भाजपचे कसबा पेठेचे आमदार हेमंत रासने हे कार्यकर्त्यांना आणि बंदोबस्तासाठी  असलेल्या पोलीसांना एका दुकानात चहा पिण्यासाठी घेऊन गेले. 

त्यावेळी प्रमोद कोंढरे यांच्यावर गर्दीचा फायदा घेऊन बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलिस निरिक्षकाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. हा सगळा प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. महिला पोलीस अधिकाऱ्याने ही गोष्ट तिच्या वरिष्ठांच्या कानावर घातली. चहाच्या दुकानाजवळच हे सीसीटीव्ही फुटेज काढून तपासण्यात आले. त्यानंतर विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रियी करण्यात आली. 

भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे स्पष्टीकरण

दरम्यान प्रमोद कोंढरे याने राजीनामा पाठवला आहे. हे नक्की कशामुळे घडले याची माहिती घेत आहोत, असे सांगण्यात आले आहे. गर्दी मुळे असे काही झाले आहे का ? याचाही अंदाज घेतला जात आहे. पोलीस चौकशी होईपर्यंत त्यांनी राजीनामा दिला आहे. या प्रकरणात तापासाअंती कळेल. मात्र मी त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना कळल्यानंतर आम्ही तातडीने कारवाई केली आङे. शहर भाजपमध्ये कुठेलेही दोन गट नाहीत, त्यामुळे काही बातम्या पसरवू नका, असे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी म्हटले आहे. प्रमोद कोंढरे याने त्याच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळले आहे. 

चित्रा वाघ काय म्हणाल्या ?

” आमच्या पक्षाचा आहे म्हणून प्रमोद कोंढरे याला पाठीशी घालणार नाही. आज सकाळीच मी पुणे शहराध्यक्ष यांच्यासोबत बोलले आहे. त्याला पदमुक्त केले आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा मी स्वतः करणार आहे. असे चित्रा वाघ म्हणाल्या. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored