Translate :

Sponsored

Priyanaka Gandhi Speech, Big News, 2026 : ‘बलात्काऱ्यांचे समर्थन कऱणाऱ्याला शिक्षण मंत्री पद..’ प्रियांका गांधींची जहरी टिका :

'बलात्काऱ्यांचे समर्थन कऱणाऱ्याला शिक्षण मंत्री पद..' प्रियांका गांधींची जहरी टिका

Priyanaka Gandhi Speech : प्रियंका गांधी यांनी संसदेच्या पावसाठी अधिवेशनात सरकारवर जहरी टिका केली आहे. त्यांच्या एका वक्तव्यानंतप संपूर्ण सभागृहात सत्ताधारी नेत्यांकडून गोंधळ सुरू झाला आहे. त्यानंतर सत्ताधारी पक्षाने कॉंग्रेस नेत्याला आपले वक्तव्य सिद्ध कऱण्यास सांगितले.

दिल्ली : 29-07-2026

संसदेच्या पावसाठी अधिवेशनाचा कालचा (28 जुलै) दिवस खूपच चर्चेचा ठरला आहे. कॉंग्रेस खासदार प्रियांका गांधी (Priyanaka Gandhi Speech) यांनी परीक्षा सुधारणा विधेयकावरून चर्चा करताना थेट नवनिर्वाचित केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्यावरच निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या शिक्षण मंत्र्यांची नियुक्ती केली. पण या पदावर एका अशा व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली ज्याने एका गर्भवती महिलेच्या बलात्कार प्रकऱणातील आरोपींच्या सुटकेला संमती दिली होती.

प्रियंका गांधींच्या वक्तव्यावर किरेन रिजिजू काय म्हणाले ? Priyanaka Gandhi Speech

प्रियांका गांधी यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण सभागृहात सत्ताधारी नेत्यांकडून गोंधळ सुरू झाला. त्यावर हे सर्व वर्तमानपत्रांमध्ये आल्याचे प्रियांका गांधी यांनी सांगितले. त्यानंतर सत्ताधारी पक्षाने कॉंग्रेस नेत्याला आपले वक्तव्य सिद्ध कऱण्यास सांगितले. तेव्हा संसंदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी, प्रियांका यांनी अशी वक्तव्ये करून नयेत, असे सांगितले. तसेच, “असे वक्तव्य म्हणजे चारित्र्यहनन आहे. प्रियांका कदाचित पहिल्यांदाच निवडून आल्या असतील. पण त्या त्यांच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत.” असेही रिजिजू यांनी नमूद केले.

अध्यक्षांनी हे वक्तव्य कामकाजातून वगळले आहे.(Priyanaka Gandhi Speech)

अध्यक्ष ओम बिरला यांनी संसदेच्या कामकाजातून हे वक्तव्य वगळले. अध्यक्ष म्हणाले, “माझा विश्वास आहे की हे सभागृह एक लोकशाही संस्था आहे. येथे बोललेला प्रत्येक शब्द अहवालात समाविष्ट आहे. मी आग्रह करेन की, तथ्यांशिवाय अशा बाबी सभागृहात मांडल्या जाऊ नयेत.”

प्रियांका गांधी विद्यार्थी आंदोलनाबद्दल काय म्हणाल्या ? (Priyanaka Gandhi Speech)

प्रियांका गांधी विद्यार्थी आंदोलनांबद्दल म्हणाल्या, अलीकडेच हजारो मुले रस्त्यावर उतरली. गांधीजींनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करत, त्यांनी आपल्या ह्रदयात अहिंसा आणि सत्य ठेवून शांततेने निर्दशने केली. त्यांनी आपला आवाज उठवला. ही भारतातील मुले आहे, जी गावांमध्ये, महानगरांमध्ये आणि लहान शहरांमध्ये राहतात.

जिथे माता आपले दागिने विकतात, वडील आपली जमीन गहाण ठेवतात आणि कुटुंबे आपल्या मुलाच्या स्वप्नासाठी आयुष्यभराची बचत खर्च करतात. आता, त्याच मुलांना वाटू लागले आहे की या देशात कष्टापेक्षा अप्रामाणिकपणा अधिक महत्त्वाचा आहे. मग, केवळ एक विद्यार्थीच नाही, तर आशाही हरवते.

विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले (Priyanaka Gandhi Speech)

विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज कऱण्याचे आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी पेलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले. “पेलेट गन वापरण्याचा आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा आदेश कोणी दिला ?” परीक्षेच्या वादावारून आंदोलन कऱणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर का करण्यात आला, असा सवाल प्रियांका गांधींनी उपस्थित केला. प्रियांका गांधींना विद्यार्थ्यावर झालेल्या या अन्यायाचे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून मागितले.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored