Prashant Jagtap Win, PMC Elections 2026 : पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 18 (वानवडी-साळुंखेविहार) या प्रभागातून प्रशांत जगताप यांचा विजय झाला आहे. प्रशांत जगताप यांच्या विजयाने कॉंग्रेसने पुण्यात पहिली जागा मिळवली आहे.
पुणे : 16-01-2026
राज्यात सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकीची (Muncipal Election Result 2026 ) गडबड सुरू आहे. 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून मतमोजणी सुरू झालेली आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झालेली आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक महापालिकांमध्ये कोण विजय मिळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र आता पुण्यामध्ये कॉंग्रेसने पहिली जागा मिळवली आहे. प्रशांत जगताप यांच्या रुपाने पहिला विजयी उमेदवार मिळाला आहे.
प्रशांत जगताप विजयी (Prashant Jagtap Win, PMC Elections 2026)
पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 18 (वानवडी-साळूंखेविहार) या प्रभागातून प्रशांत जगताप उमेदवार होते. त्यांनी हा विजय मिळवला आहे. प्रशांत जगताप यांच्या विरोधात भाजपाची कडवी लढाई होती. मात्र अशा परिस्थितीतही प्रशांत जगताप यांनी पूर्ण ताकदीने लढत दिल्याने त्यांचा विजय झाला आहे. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या शिवरकरांचा प्रशांत जगताप यांनी पराभव केला आहे. यामुळे पुण्यामध्ये आता पुन्हा एकदा प्रशांत जगताप यांची राजकीय ताकद दिसून येत आहे.
पुण्यामध्ये प्रशांत जगताप यांची उमेदवारी हा मोठा चर्चेचा विषय ठरला होता. प्रशांत जगताप हे पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये नाराज होते. शहराध्यक्ष नाराज असल्यामुळे शरद पवार गट अजित पवार गटासोबत असलेल्या युतीचा विळखा मोडणार का? याची सर्वत्र चर्चा रंगली होती. या चर्चोदरम्यान प्रशांत जगताप यांनी कॉंग्रेसचा हात धरला होता. प्रशांत जगताप यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत जोरदार प्रचार केला होता. प्रशांत जगताप यांच्या विजयी खेळीने आता त्यांची राजकीय ताकद दिसून आली आहे. आणि त्यांच्यामुळे कॉंग्रेसला पहिली जागाही पुण्यात मिळाली आहे.
This post was last modified on January 16, 2026 2:27 pm